Goa River Drowning Cases Dainik Gomantak
गोवा

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Sattari River Drowning Cases: सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नद्यांवर उन्हाळी हंगामात स्थानिकांसह बाहेरील तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि नागरिक आंघोळीसाठी येत असतात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नद्यांवर उन्हाळी हंगामात स्थानिकांसह बाहेरील तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि नागरिक आंघोळीसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी मद्यसेवन, निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या अभावामुळे दरवर्षी बुडून मृत्यूच्या घटना घडत असून स्थिती चिंताजनक बनली आहे.

अनेकजण केवळ आंघोळीसाठी येत असले तरी काही लोक नदीकिनारी मद्यसेवन करून नशेच्‍या धुंदीत पाण्यात उतरतात. त्यामुळे धोका अधिक वाढतो. नदीतील पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग किंवा तळाचा अंदाज नसल्याने बाहेरून येणारे नागरिक अनेकदा संकटात सापडतात. गत एप्रिल महिन्यात भिरोंडा येथील म्हादई नदीत एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला होता. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. भिरोंडा, उस्ते आणि इतर भागांत तर बाटल्यांचा खच दिसून येतो.

 महत्त्‍वपूर्ण कारणे

  • मद्यसेवन करून नदीत उतरणे

  •  पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणे

  •  सुरक्षा यंत्रणेचा अभाव

  •  पर्यटकांची वाढती बेफिकिरी

 उपाययोजना काय हव्यात?

  • धोकादायक ठिकाणी बंदी आदेश

  •  सूचना फलक, जीवरक्षकांची नियुक्ती

  •  मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई

  •  स्थानिक स्वराज्य संस्थांची देखरेख

नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना आपला जीव धोक्यात घालू नका. सुरक्षितता आणि शिस्त हीच खरी खबरदारी आहे. -रघू गावकर, सावर्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

SCROLL FOR NEXT