Valpoi Police Dainik Gomantak
गोवा

Sattari News: वाळपईत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; केवळ 3 दिवसांत 100 पेक्षा अधिक घरांची झडती

Valpoi Police Combing Operation: पोलिसांनी वाळपई परिसरात केवळ तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्ती घरांची झडती घेती आहे

Akshata Chhatre

सत्तरी: वाळपई सत्तरी येथे बेकायदेशीर शिकारीसाठी निघालेल्या समद खान (२२) याचा गोळी लागून मृत्यू झाला. मृत्यूच्या या प्रकरणानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी परिसरात पाहणीला सुरुवात केली आहे. वाळपई पोलिसांकडून संशयितांच्या घराभोवती तपासणी सुरु झालीच मात्र त्यासोबत पोलिसांनी वाळपई परिसरात केवळ तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्ती घरांची झडती घेतली आहे.

या युवकाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले संशयित बाबू उमर संघार व गाऊस नूर अहमद पटेल (म्हाऊस) यांना गुरुवारी दुपारी म्हापसा न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठरी सुनावण्यात आली. ही कोठडी संपल्यानंतर ३० डिसेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायलयात हजर करण्यात येणार आहे.

दोघांच्या अटकेनंतर पोलिसांनी वाळपईच्या परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. या परिसराततून काही संशयास्पद वस्तू पोलिसांच्या हाती लागल्याने त्यांनी सदर मोहीम राबवायला सुरुवात केली.

वाळपई परिसराची झडती घेण्यासाठी पोलिसांनी पाच तुकड्यांची निर्मिती केली आणि या पाचही तुकड्यांनी शहरातील विविध भागांमध्ये झडती घ्यायला सुरुवात केली. या कारवाईत पोलिसांना वन विभागाकडून मदत करण्यात येईल तसेच काही महत्वाचे धागेदोरे सापडल्याने अजून काही आरोपींना अटक होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बेकायदेशीरपाने राहणाऱ्यांचा सुगावा

वाळपईच्या परिसरात अनेक भाडेकरू बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या या परप्रांतीयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे आणि अशा बेकायदेशीर परप्रांतीयांना थारा देऊ नये असा आदेश पोलिसांनी जारी केला आहे. काही दिवसांपूर्वी जिथे किरकोळ परप्रांतीयांची घरं होती मात्र आता या संख्येत वाढ झाली असल्याने पोलिसांच्या तपासने वेग धरलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

Laxmi Narayana Rajyog 2026: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या 3 राशींचं नशीब पालटणार; 'लक्ष्मी नारायण राजयोग' करणार धनवर्षाव!

Cricket Fixing: टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का! 'या' स्टार फलंदाजावर फिक्सिंगचा आरोप, 'ICC'कडून तत्काळ निलंबन

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

Ajit Pawar: "हो ला हो अन् नाही ला नाही" सांगणारा सिंह हरपला! गडकरींनी सांगितला अजितदादांच्या रोखठोक निर्णयांचा किस्सा

SCROLL FOR NEXT