Sattari River ,goa Diniak Gomntak
गोवा

सत्तरीतील बंधारे बनले मद्यपींचे अड्डे! नदीपात्रात बाटल्यांचा खच आणि हुल्लडबाजी; उस्ते गावात मद्यपींचा धिंगाणा

Sattari River : सत्तरीतील नदीपात्रांत बुडून मृत्यूच्या घटना वाढत असतानाच दुसरीकडे येथील नद्यांवरील बंधाऱ्यांवर मद्यपींचा धुडगूस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई : सत्तरीतील नदीपात्रांत बुडून मृत्यूच्या घटना वाढत असतानाच दुसरीकडे येथील नद्यांवरील बंधाऱ्यांवर मद्यपींचा धुडगूस सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बंधाऱ्यांवर आंघोळीसाठी येणारे अनेकजण सोबत दारूच्या बाटल्या घेऊन येतात आणि दिवसभर मद्यपान करून धुडगूस घालतात. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते गावातील बंधाऱ्यांवर सध्या हे चित्र दिसून येत असून दिवसभर येथे मद्यपींचा धुमाकूळ सुरू असतो. उन्हाळ्यात अनेकांची पावले सत्तरीतील नद्यांकडे वळतात. नद्यांवरील बंधारे हे काहींसाठी धुडगूस घालण्याचे ठिकाण बनले असून दिवसभर दारू पिऊन येथे गैरवर्तन केले जाते.

स्थानिक पंच रामू खरवत यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला असूनही कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे ते सांगतात. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.सत्तरीतील नद्या व बंधाऱ्यांमुळे तालुक्याला पाणीसमृद्धी लाभली आहे. येथील शेती व कुळागरे या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात बंधारे अडवले जातात, ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी; मात्र सध्या हे बंधारे स्थानिकांसाठी मनस्तापाचे केंद्र बनले आहेत.

बंधाऱ्यांमध्ये आंघोळीसाठी येणारे अनेकजण सोबत दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आदी घेऊन येतात. खाणे-पिणे झाल्यानंतर कचरा तेथेच टाकून ते निघून जातात. त्यामुळे नदीपात्राचे प्रदूषण वाढत असून परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेक बंधारे सध्या कचऱ्याने तुंबलेले दिसत आहेत. वनक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो.

फेकलेल्या बाटल्या धोकादायक

अनेकजण नदीपात्रात तसेच परिसरात बाटल्या फोडून टाकतात. त्यामुळे हा परिसर धोकादायक बनला आहे. स्थानिक नागरिक तसेच जनावरांना याचा मोठा त्रास होत आहे. काच लागून जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.

सरकारने दखल घ्यावी

बंधारे व नदी परिसरात दारू पिऊन दंगामस्ती करणाऱ्यांवर तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच बंधाऱ्यांमध्ये उतरण्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT