Sattari Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Sattari Heavy Rain: सत्तरी तालुक्यात चक्रीवादळाचे धुमशान; शेकडो झाडे उन्मळून पडली; घरे, वीजवाहिन्यांचे नुकसान; अग्निशमन दलाची धावपळ

Sattari Storm Damage: सत्तरी तालुक्यात रविवारी (ता.५) रात्रीपासून सोमवारी (ता.६) सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: सत्तरी तालुक्यात रविवारी (ता.५) रात्रीपासून सोमवारी (ता.६) सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी शेकडो झाडे उन्मळून पडली, अनेक घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले, तर ११ केव्हीसह अनेक वीजवाहिन्या आणि वीजखांब जमीनदोस्त झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

अनेक रस्ते बंद पडल्याने वाहतूक खोळंबली. अग्निशमन दल, वीज खाते आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व पुनर्वसनाचे काम हाती घेतले असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. अंदाजे गेल्या दोन दिवसांत तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून केवळ वीज खात्याचेच सुमारे ३० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, खोतोडे पंचायत क्षेत्रातील बाराजण येथे सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अरविंद शिवाजी म्हाळशेकर यांच्या घराशेजारील भले मोठे वडाचे झाड मुळासकट उन्मळून त्यांच्या जुन्या आणि नव्याने बांधलेल्या घरावर कोसळले. या झाडासोबत फणस व इतर झाडेही घरावर पडली.

नव्या घराचे छप्पर उडून गेल्याने पावसाचे पाणी घरात शिरले. घरातील फर्निचर, फ्रिज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फरशी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. जुन्या घरावरील कौले व संपूर्ण छप्परही कोसळले. दुर्घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचबरोबर त्यांच्या बागायतीतील नारळ, सुपारी, केळी व इतर झाडेदेखील उन्मळून पडल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले.

तसेच वेळगे-गोमळ-सत्तरी येथे अंकुश घोलकर यांच्या घरावर सागवानचे झाड कोसळल्याने घराच्या छपरावरील कौले फुटून पावसाचे पाणी घरात शिरले. घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण तालुक्यात अग्निशमन दल, वीज खाते आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

रस्त्यांवरील झाडे हटविणे, वीजवाहिन्या दुरुस्त करणे, घरांवरील झाडे हटविणे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मदतकार्यासाठी हेल्पलाईनही जारी केली आहे. मदतकार्यामध्ये सहभागी अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गावस, कृष्णा नाईक, दत्ताराम देसाई, आनंद शेटकर, अरविंद देसाई आणि तर जवानांनी मदतकार्य केले.

नगरगाव भागालाही बसला तडाखा

नगरगाव-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवारी सकाळपासून वादळी पावसाने कहर केल्याने धावे, तार, आंबेडे, नगरगाव, उस्ते अशा अनेक गावांमध्ये झळ बसली. धावे गावात बागायती पिकात मोठ-मोठी जुनी झाडे पडल्याने तसेच वाऱ्यामुळे सुपारीची झाडे उन्मळून, मधून वाकून पडली आहेत. धारखंड गावात वाळपई मार्गावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता व वीजपुरवठा बंद झाला होता. मोठ्या पावसामुळे वाळपईतील रस्त्यांवर पाणी साचले होते.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाडांची पडझड

चक्रीवादळामुळे सत्तरीतील अनेक गावांमध्ये झाडे रस्त्यावर, घरांवर आणि वीजवाहिन्यांवर कोसळली. त्यामध्ये डोंगुर्ली (टाटा फार्म कंपनी परिसर), नानेली-दत्त मंदिर, चोर्लाघाट येथे सुमारे ५ ठिकाणी, भुईपाल-गावकरवाडा, केळावडे-सतेरी मंदिर, गुरववाडा-पर्ये, दाबे, बिंबल बाराजण, धामशे, खोतोडा, वेळगे, कोपार्डे, होंडा, केरी, पर्ये, नाणूस, रेडीघाट, शिगणे-पिसुर्ले व इतर भागांचा समावेश आहे.

११ केव्ही वीजवाहिनी जमीनदोस्त

सोमवारी (ता.६) सायंकाळी ठाणे-सत्तरी येथील फोरेस्ट चेकपोस्टजवळ दूध सोसायटीसमोरील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत चार वीजखांबांसह ११ केव्ही वीजवाहिनी जमीनदोस्त झाली. त्याचवेळी पाली-सत्तरी येथील युवक विठू वरक दुचाकीवरून जात असताना झाड त्यांच्या वाहनावर कोसळले. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि वाहतुकीवर परिणाम झाला.

दैव बलवत्तर म्हणून वाचले!

रविवारी (ता.५) रात्री खडकी-परवारवाडा येथे भलेमोठे वडाचे झाड रस्त्यावर कोसळून दोन वीजखांब आणि संपूर्ण वीजवाहिनी जमीनदोस्त झाली. याचवेळी धामशे येथील लक्ष्मण गावकर हे दुचाकीवरून घरी जात असताना झाड त्यांच्या वाहनावर कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने वीजवाहिनी तुटूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT