Bicholim Heavy Rain: लाटंबार्सेत घरावर कोसळले झाड; 2 लाखांची हानी, डिचोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Tree Falls On House: डिचोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 Tree Falls On House
Bicholim Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावरधाट-लाटंबार्से येथे दुपारी मोठी दुर्घटना घडली. एका जुनाट फणसाचे झाड घरावर कोसळल्याने छपराचा पुढील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला.

घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लिडींग फायर फायटर अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी झाड हटवण्याचे काम केले. नंतर जेसीबीच्या साहाय्याने ओंडके बाजूला करण्यात आले. दरम्यान, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कुटुंबाला धीर दिला.

 Tree Falls On House
Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

वृद्ध महिला थोडक्‍यात बचावली

या घटनेत घरातील वृद्ध महिला सखू वरक या ओसरीवर बसलेल्या असताना झाड कोसळले. सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या, मात्र कौलाचा तुकडा लागून त्यांना किरकोळ जखमी झाल्‍या. घरमालक प्रकाश वरक यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com