Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: सत्तरीत सुपारीच्या तोडणीला जोर; कुशल कामगारांची धावपळ, दरवाढीची मागणी

Areca Nut Farming: सत्तरी तालुक्यातील बागायतदारांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या सुपारीच्या ओल्या फळांच्या पहिल्या तोडणीला जोर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील बागायतदारांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या सुपारीच्या ओल्या फळांच्या पहिल्या तोडणीला जोर आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या हंगामामुळे बागायतदार सध्या काढणीच्या कामात व्यस्त आहेत. सुपारीच्या झाडांवर चढून फळांचे घड काढण्यासाठी कुशल कामगारांची मदत घेतली जात आहे.

सुपारीला चांगला दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत बागायतदारांचा या पिकाकडे कल वाढला आहे. लागवडीनंतर साधारण पाच ते सहा वर्षांनी झाडांना फळे येण्यास सुरुवात होते. हंगामात गरजेनुसार तीन ते चार वेळा काढणी केली जाते. पूर्ण पक्व झालेली पिवळसर किंवा नारंगी रंगाची फळे तोडली जातात. पावसाळ्यात जमिनीवर पडलेली परिपक्व फळेही गोळा करून वाळवून ठेवली जातात.

सुपारीची झाडे २० ते ३० फूट किंवा त्याहून अधिक उंच असल्याने काढणीचे काम कष्टाचे असते. पारंपरिक पद्धतीत कुशल कामगार झाडावर चढून विळ्याच्या साहाय्याने घड कापतात. काही ठिकाणी लांब दांड्याला विळा जोडलेल्या उपकरणांचाही वापर केला जातो. काढणीनंतर घडांमधून फळे वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात. पांढरी सुपारी तयार करण्यासाठी पूर्ण पक्व फळे साधारण ४० ते ४५ दिवस वाळवावी लागतात.

दरात घसरण; बागायतदार चिंतेत

गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या वाळपई शाखेत गतवर्षी वाळवून ठेवलेली सुपारी सोलून विक्रीसाठी आणली जात आहे. यंदा मार्चमध्ये प्रतिकिलो ४४५ रुपये असलेला दर घसरून सध्या ३९० रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे सुपारीचा दर पुन्हा चारशे रुपयांच्या पुढे जावा, अशी मागणी बागायतदार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shocking! वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 3 टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूचा अचानक मोठा निर्णय

खरी कुजबुज: भाजपमध्ये उमेदवारांची झुंबड, विरोधकांत गटबाजीचा गोंधळ

ST Reservation: गोव्यातील 4 विधानसभा मतदारसंघ एसटींसाठी आरक्षित होणार? मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

RBI Plastic Currency: ऑस्ट्रेलिया-कॅनडाप्रमाणे भारतातही प्लास्टिकच्या नोटा! 10 आणि 20 रुपयांसाठी पॉलिमर नोटांचा प्रयोग, काय आहे RBI चा प्लॅन?

GMC Recruitment: गोमेकॉत परिचारिकांची 178 पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; मंत्रिमंडळाची मान्यता

SCROLL FOR NEXT