Sateri Dainik Gomantak
गोवा

Xeldem: 'गोव्यातील शिक्षण, संस्कृती 'मराठी'मुळेच टिकून', वेलिंगकरांचे प्रतिपादन; शेल्‍डेत मराठी राजभाषा निर्धार मेळावा

Marathi Language Goa: मेळावा आयोजक प्रमुख शिवानंद देसाई यांनी मराठी राजभाषा निर्धार कार्यक्रमाला असेच सहकार्य करावे, अशी आशा व्यक्त करीत आभार मानले.

गोमन्तक डिजिटल टीम

केपे: गोव्‍यातील मराठीला अडीच हजार वर्षांहून अधिक परंपरा लाभलेली आहे. गोव्‍यातील शिक्षण आणि संस्‍कृती या भाषेमुळेच टिकून आहे, असे मत राजेंद्र सुभाष वेलिंगकर यांनी शेल्‍डे येथील श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थान सभागृहात झालेल्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्‍यात व्‍यक्‍त केले. मेळावा उत्साहात पार पडला.

रविवारी झालेल्या या मेळाव्‍याची सुरवात वेलिंगकर यांच्‍या हस्ते झाली. यावेळी मोहनदास गावस देसाई, दिवाकर गावस देसाई, सत्यवान नाईक, त्र्यवेंद्र सावंत, अमीर भगत, रुपाली वेळगेकर, शिवानंद देसाई, ज्योति परशुराम माने, मोहन चंदगडकर उपस्थित होते.

रुपाली वेळगेकर यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास विदित करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मेळावा आयोजक प्रमुख शिवानंद देसाई यांनी मराठी राजभाषा निर्धार कार्यक्रमाला असेच सहकार्य करावे, अशी आशा व्यक्त करीत आभार मानले. सामुहिक शांतिपाठ मंत्राने ह्या मेळाव्याची सांगता झाली.

दरम्यान, शेल्‍डे मातृशक्ति व युवाशक्तिच्या समित्या जाहीर करण्यात आल्या. त्यात शेल्डे युवाशक्ति समिती : अमीर भगत, साईदीप गावस देसाई, कलश गावस देसाई, मयुर मारुती गोनल, विघ्नेश रामदास गावस देसाई, अभय गावस देसाई. शेल्डे मातृशक्ति समिती: प्रतिमा सं. गावस देसाई, वैशाली शं. गावस देसाई, स्वेता सुदेश नाईक, स्नेहल वि. जगताप, ज्योति परशुराम माने, योजना राजेश नाईक. या मेळाव्यास मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Ketu Gochar 2026: करिअर, पैसा आणि प्रगती! 25 नोव्हेंबरला राहु-केतु गोचर; ‘या’ 5 राशींसाठी सुवर्णकाळ

Sindhudurg News: बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश! मालवणमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त, एकावर कारवाई

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सची अखेरपर्यंत कडवी झुंज, पण मोहन बागानचा 2-1 ने विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप

राड्याचीच चर्चा..! IND vs PAK सामन्यातील 'त्या' 5 प्रसंगांनी वाढवलं मैदानावरचं तापमान; हर्षित राणाला घेरणाऱ्या पाकड्यांशी भिडला टीम इंडियाचा कॅप्टन Watch Video

Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

SCROLL FOR NEXT