Goa Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Goa Hit And Run Case: शिरसई हिट अ‍ॅण्ड रन! साताऱ्याचा व्यक्ती ठार, झारखंडच्या टॅक्सी चालकाला अटक

Goa Hit And Run Case: शिरसई येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सातारा, महाराष्ट्र येथील 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Pramod Yadav

Goa Hit And Run Case

शिरसई येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सातारा, महाराष्ट्र येथील 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी झारखंडच्या टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

शिरसई ग्रामपंचायत समोर (बुधवारी) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राजेंद्र चव्हाण (वय 44, रा. सातारा, महाराष्ट्र) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

राजेंद्र चव्हाण त्यांच्या इतर साथीदारांसोबत शिरसाई येथे एका घराचे रंगकाम करत होते. दुपारी तीनच्या सुमारास जेवण केल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी चव्हाण बाहेर आले, त्यांचे इतर सहकारी तिथेच विश्रांती करत होते.

दरम्यान, चव्हाण यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर ते जखमी अवस्थेत रस्त्याच्या शेजारी पडले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती कोलवाळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा केला. याठीकाणी असलेले सीसीटीव्ही तपासल्यानंतर अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून, यात एका भरधाव कार चव्हाण यांना जोराची धडक देऊन फरार झाल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अभिषेक वर्मा (झारखंड) याला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT