Goa Accident: उसगाव प्रवासी बस आणि पर्यटक टॅक्सी अपघात; जखमी 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Goa Accident Case: पोलिसांनी याप्रकरणी कार चालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak

Goa Accident Case

फोंडा ते मोले महामार्गावर बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस व टुरिस्ट टॅक्सी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील सहाजणांसह बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. यात सहा महिन्यांचे लहान बाळ देखील जखमी झाले होते. या बाळाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी कार चालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

फोंडा ते मोले महामार्गावर प्रवासी बस फोड्याहून तिस्क- उसगावच्या दिशेने तर टुरिस्ट टॅक्सी तिस्क-उसगावहून फोंड्याला जात होती. उसगावात नेस्ले कंपनीसमोर दोन्ही गाड्यांची टक्कर झाली.

या अपघातात कारमधील चालक शंकर चौगुले, पूजा चौगुले, अमृता चौगुले, रेणुका आजगावकर, पल्लवी आजगावकर आणि एक सहा महिन्यांची बालिका गंभीर जखमी झाली. बसमधील तीन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या.

Goa Accident Case
Turtle Eggs At Morjim: २५ वर्षांतील विक्रम ; मोरजी किनारी २१४ कासवांनी घातली २२ हजारांपेक्षा जास्त अंडी

दरम्यान, जखमी सहा महिन्यांच्या बाळाचा जीएमसीत उपाचारादम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अपघातानंतर जखमी सर्वांना प्रथम आयडी इस्पितळात तर तेथून नंतर काहीजणांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी रुग्णांना इस्पितळात पोहोचविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागला, त्यासाठी मगोचे केतन भाटीकर व काँगेसचे राजेश वेरेकर यांनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com