Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोव्‍याच्‍या अस्‍तित्‍वासाठी एकत्र या; ‘गोवा बचाव’ची हाक

Goa News : आदर्श वनिता हायस्कूलच्या नरसिंह नायक सभागृहात ती घेण्‍यात येणार होती. पण परवानगी नाकारल्‍याने आज ती ग्रेस चर्च सभागृहात घेण्‍यात आली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, गोव्‍याचे अस्‍तित्‍व संकटात सापडले आहे. त्‍यासाठी बुद्धिजीवींनी विधायकतेसाठी एकवटले पाहिजे, असा सूर ‘गोवा बचाव अभियान’ सभेतून व्‍यक्‍त झाला. यावेळी भूमी रक्षणार्थ काही ठरावही घेण्‍यात आले.

डॉ. लोहिया मैदानावर ही सभा होणार होती. पण त्‍यास मडगाव नगरपालिकेने परवानगी नाकारली. आदर्श वनिता हायस्कूलच्या नरसिंह नायक सभागृहात ती घेण्‍यात येणार होती. पण परवानगी नाकारल्‍याने आज ती ग्रेस चर्च सभागृहात घेण्‍यात आली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सर्व वक्त्यांनी गोव्याचा सांस्कृतिक, पर्यावरणीय सांभाळ करण्यावर भर दिला. गोव्‍यासाठी घातक निर्णय लोकांना कळावेत, यासाठी ही सभा आयोजित केल्याचे डॉ. सबिना मार्टिन्स यांनी सांगितले. यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई, किशोर नाईक गावकर, धीरेन फडते, जॅक मास्कारेन्हस, अँथनी डिसिल्वा यांची भाषणे झाली.

गोव्‍याचे बदलते स्‍वरूप आणि आपली कर्तव्‍ये यावर वक्त्‍यांचा भर राहिला. संजय नाईक यांनी भोम येथील लोकांविरोधात जाऊन रस्ता बांधण्याचे व त्यासाठी मंदिर पाडण्याचा सरकारच्या उद्देशाबद्दल सांगितले. सेबी फर्नांडिस यांनी सांकवाळ भुतानी प्रकल्पासाठी डोंगर कापणी करण्‍यात येत असल्‍याची माहिती दिली. तर, ग्लेन काब्राल यांनी ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बंगल्याची माहिती दिली. पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनीही विचार व्यक्त केले.

मोपा विमानतळ वरदान नव्‍हे, शाप!

मोपा विमानतळ हे पेडणे तालुक्यातील लोकांसाठी वरदान नसून शाप आहे. या विमानतळामुळे पाण्याचे स्त्रोत बंद झाल्याने पेडणे तालुक्यातील लोकांचे हाल होत आहेत. ज्यांच्‍या जमिनी गेल्‍या आहेत, त्यांना अजून मोबदला मिळालेला नाही, असे पत्रकार किशोर नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Highway: पर्वरीकरांनो लक्ष द्या! महामार्ग रुंदीकरणासाठी 2 जानेवारीपासून वाहतूक बंद; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Pride Of Goa 2025: "मी गोवा सोडला, पण गोव्याने मला कधीच सोडले नाही!" 'फॉर्च्युन 500' कंपनीचे CEO सचिन लवंदे मायभूमीत भावूक

Goa Special Trains: गोमंतकीय भाविकांना 'रामलल्ला' साद घालणार! 3 जानेवारीपासून अयोध्या आणि वालंकिणीसाठी विशेष रेल्वे; 'मुख्यमंत्री देवदर्शन योजना' पुन्हा सुरु

Goa Politics: 'सिंह' गर्जला, गावडे भडकले! भाजप-मगोप नेत्यांमधील वादाने गोव्याचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कुणाला मिळणार 'न्याय'?

Goa Municipal Elections: काँग्रेसला 'नो एन्ट्री', पण इतरांना साद! पालिका निवडणुकांसाठी 'आप'ची नवी रणनीती; 'स्वबळ' की 'युती'चा नवा फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT