Pride Of Goa 2025: "मी गोवा सोडला, पण गोव्याने मला कधीच सोडले नाही!" 'फॉर्च्युन 500' कंपनीचे CEO सचिन लवंदे मायभूमीत भावूक

Sachin Lawande Visteon CEO: गोव्यातील प्रतिभा गोव्यातच रहावी आणि ती बाहेर जाऊ नये यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. जग जिंकण्‍याची क्षमता या प्रतिभेत आहे.
Sachin Lawande Visteon CEO:
Sachin Lawande Visteon CEO:Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील प्रतिभा गोव्यातच रहावी आणि ती बाहेर जाऊ नये यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. जग जिंकण्‍याची क्षमता या प्रतिभेत आहे, असे प्रतिपादन ‘व्हिस्ट्योन’ या फॉर्च्यून ५०० कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन लवंदे यांनी केले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्‍ड इंडस्‍ट्री आणि काशिनाथ दामोदर नाईक मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ‘प्राईड ऑफ गोवा : २०२५’ पुरस्कारांचे आज शनिवारी मडगावात (Margao) गोमंत विद्या निकेतन सभागृहात वितरण झाले. यावेळी अमेरिकन कंपनीचे मालक सचिन लवंदे यांना ‘उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रख्यात उद्योजिका आणि फोमेंतो रिसॉर्ट कंपनीच्या प्रमुख अंजू तिंबलो यांना ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार भेटविण्‍यात आला. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड आणि काशिनाथ दामोदर नायक ट्रस्टचे दत्ता दामोदर नायक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Sachin Lawande Visteon CEO:
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंतांनी आपल्याकडे ‘गृहनिर्माण खाते ’ का घेतले? गोमंतकीयांसाठी येणार मोठी योजना

उद्योजक दत्ता नायक यांनी आपल्या भाषणात आमचा समाज धनविरोधी असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक संदेश पोहोण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज प्रदान करण्‍यात आलेल्‍या पुरस्कारांबाबतही त्यांनी आपली भूमिका विषद  केली. यावेळी व्यासपीठावर हर्षवर्धन भटकुळे, संदीप भांडारी, संजय आमोणकर, विजय हेदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिमा धोंड यांनी स्वागत केले तर अंबिका कामत धाकणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Sachin Lawande Visteon CEO:
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

मी गोवा सोडला, पण गोव्‍याने मला सोडले नाही

गोव्यात (Goa) प्रचंड गुणवत्ता आहे. मात्र त्‍यासाठी संधीची कवाडे उघडी करावी लागतील. मी ३५ वर्षांपूर्वी गोवा सोडला, मात्र गोव्याने मला कधीच सोडले नाही. गोवा आकाराने लहान असला तरी सर्वगुणसंपन्न आहे. या गोव्यात प्रतिभा ठासून भरलेली आहे, पण दुर्दैवाने तिचा वापर करण्याची संधी येथे मिळत नाही. उद्योजक आणि सरकारने एकत्रित प्रयत्न करून अशा संधी उपलब्‍ध करून दिल्‍या पाहिजेत, जेणेकरून गोव्यातील प्रतिभा गोव्यातच राहील, असे उद्योजक सचिन लवंदे यांनी सांगितले.

Sachin Lawande Visteon CEO:
CM Pramod Sawant: प्रमोद सावंतांनी मुंबईत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; सुख-समृद्धीची केली प्रार्थना

अंजू तिंबलो यांनीही व्‍यक्त केल्‍या भावना

अंजू तिंबलो यांनी गोव्याबाबतच्‍या आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. विवाहानंतर आपण गोव्यात आले तेव्हा येथे कसे होणार, याबाबत मनात धाकधूक होती. मात्र नंतर ती दूर झाली. माझी सासू नेहमीच माझ्याशी कोकणीतून बोलत असे. तिनेच मला ही भाषा शिकविली. त्यानंतर दोन जुळ्या मुलांना मी जन्म दिला. अवधूत तिंबलो हे मला जीवनसाथी लाभले हे माझे भाग्य होय, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com