Porvorim Highway: पर्वरीकरांनो लक्ष द्या! महामार्ग रुंदीकरणासाठी 2 जानेवारीपासून वाहतूक बंद; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Porvorim Highway Widening: पर्वरी येथील महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी तेथील वाहतूक २ जानेवारी ते २ मार्च २०२६ पर्यंत बंद करण्याचा निर्णय उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
porvorim elevated corridor
porvorim elevated corridorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्वरी येथील महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी तेथील वाहतूक २ जानेवारी ते २ मार्च २०२६ पर्यंत बंद करण्याचा निर्णय उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. या कालावधीत बंद असलेल्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

उत्तर गोवा (North Goa) जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी काढलेल्या आदेशानुसार, बाह्यविकास योजनेच्या (ओडीपी) रस्त्यालगतचा खांब (पी-१६) क्रमांक १६ पासून दामियान दी गोवाजवळील खांब २० पर्यंतचा रस्ता (पहिला टप्पा) तसेच कदंब रेस्टॉरंटजवळील खांब ६१ पासून हॉटेल ओ कोकेरा जंक्शनजवळील खांब ५५ पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

porvorim elevated corridor
Porvorim Highway: पर्वरीतील महामार्ग वाहतूक बदलाला ‘ब्रेक’

या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी म्हापशाहून पणजीकडे येणारी अवजड वाहने ओडीपी रस्त्यांवरून जाण्यास मनाई असणार आहे. मात्र या रस्त्याची दुसरी लेन म्हापशाहून पणजीकडे येण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गावर आवश्यक ते विद्युतीकरण करण्यात आले असून झाडेझुडपांचे अडथळे हटवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी, विशेषतः अग्निशामक व रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन राखीव ठेवण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गावर कंत्राटदाराने किमान दोन वाहतूक मार्शल नेमणे बंधनकारक आहे.

एखादे वाहन बंद पडल्यास ते हटवण्यासाठी क्रेनची व्यवस्था करणे कंत्राटदारावर बंधनकारक असेल. ही सेवा पर्वरी वाहतूक पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे.

porvorim elevated corridor
Porvorim News: पर्वरीच्या रस्त्यावर 'बिअर'चा पूर! धावत्या ट्रकवरून बॉक्स कोसळले, काचेच्या तुकड्यांमुळे वाहतूक धोक्यात

वाहतूक बदल थोडक्यात असा

कालावधी : २ जानेवारी ते २ मार्च २०२६

बंद मार्ग :

पी-१६ खांब ते खांब २० (दामियन दी गोवा)

खांब ६१ (कदंब रेस्टॉरंट) ते खांब ५५ (हॉटेल ओ कोकेरा जंक्शन)

अवजड वाहनांना ओडीपी रस्त्यांवर बंदी

अग्निशामक व रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन

कंत्राटदाराला वाहतूक बंद करण्याचा अधिकार नाही

किमान २ वाहतूक मार्शल व क्रेनची व्यवस्था बंधनकारक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com