Goa Municipal Elections
AAP Goa StrategyDainik Gomantak

Goa Municipal Elections: काँग्रेसला 'नो एन्ट्री', पण इतरांना साद! पालिका निवडणुकांसाठी 'आप'ची नवी रणनीती; 'स्वबळ' की 'युती'चा नवा फॉर्म्युला?

AAP Goa Strategy: नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत पराभवाचा झटका सहन कराव्‍या लागलेल्‍या आम आदमी पक्षाने (आप) आगामी पालिका आणि पणजी महानगरपालिकेच्‍या निवडणुकाही तूर्तास स्‍वबळावरच लढवण्‍याचा निर्णय घेतला आहे.
Published on

पणजी: नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत पराभवाचा झटका सहन कराव्‍या लागलेल्‍या आम आदमी पक्षाने (आप) आगामी पालिका आणि पणजी महानगरपालिकेच्‍या निवडणुकाही तूर्तास स्‍वबळावरच लढवण्‍याचा निर्णय घेतला आहे. परंतु, भविष्‍यात काँग्रेस वगळून इतर स्‍थानिक पक्ष युतीस तयार असतील तर त्‍यांना सोबत घेऊन या निवडणुकांचा सामना करण्‍याचेही पक्षाने निश्‍चित केल्‍याची माहिती आपच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्याने ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

राज्‍यात २०२२ मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकलेल्‍या आपचा आत्‍मविश्‍‍वास जिल्‍हा पंचायत निवडणुकीत उंचावला होता. त्‍यामुळे पक्षाने काँग्रेससोबत युती टाळून तब्‍बल ४२ उमेदवारांना जिल्‍हा पंचायतीच्‍या रिंगणात उतरवले. परंतु, त्‍यांचा केवळ एकमेव उमेदवार निवडून आला.

Goa Municipal Elections
Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

अनेकांचे डिपॉझिटही जप्‍त झाले. शिवाय मतांची टक्‍केवारीही घटली. या पराभवाची जबाबदारी ठरवून पक्षाने राज्‍य संयोजक अमित पालेकर यांची पदावरून उचलबांगडीही केली. या घडामोडींमुळे पक्षाच्‍या कार्यकर्त्यांत निराशेचे वातावरण असले, तरी लवकरात लवकर त्‍यांच्‍यातील विश्‍‍वास जागा करून त्‍यांना पालिका आणि पणजी महानगरपालिकेच्‍या निवडणुकांसाठी तयार करण्‍याच्‍या हालचाली प्रभारी आतिषी यांनी सुरू केल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील पराभवामुळे आप भविष्‍यात काँग्रेससोबत (Congress) युती करून निवडणुकांना सामोरे जाऊ शकतो, असा अंदाज काही जणांकडून बांधला जात होता. परंतु, आगामी पालिका, मनपा आणि विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसशिवायच उतरण्‍याच्‍या निर्णयावर पक्ष ठाम आहे. या काळात राज्‍यातील स्‍थानिक पक्षांनी आपसोबत येण्‍याचे ठरवले, तर त्‍यांच्‍याशी युती करून या निवडणुका लढवण्‍याचा निर्णय पक्ष घेऊ शकतो, असेही सूत्रांनी नमूद केले

Goa Municipal Elections
Municipal Elections: फातोर्ड्यासह मडगावातील पालिका प्रभागांतही निवडणूक लढवू - विजय सरदेसाई

नवा संयोजक लवकरच!

अमित पालेकर (Amit Palekar) यांना राज्‍य संयोजकपदावरून हटवल्‍यानंतर श्रीकृष्‍ण परब यांच्‍याकडे संयोजकपदाचा अतिरिक्त ताबा देण्‍यात आला आहे. पुढील काही दिवसांत राज्‍य संयोजकपदी योग्‍य नेत्‍याची निवड करून त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली पुढील निवडणुका लढवल्‍या जाणार असल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com