Goa Politics: 'सिंह' गर्जला, गावडे भडकले! भाजप-मगोप नेत्यांमधील वादाने गोव्याचे राजकारण तापले; मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कुणाला मिळणार 'न्याय'?

BJP MGP Alliance Conflict: जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आता अध्यक्षपदी कोणाला बसवायचे याची भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे.
Sudin Dhavalikar, Govind Gaude
Sudin Dhavalikar, Govind Gaude Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि आता अध्यक्षपदी कोणाला बसवायचे याची भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मात्र भाजप-मगोप नेत्यांच्या शाब्दिक चिखलफेकीमुळे कार्यकर्त्यांचे मनोरंजन होत असले, तरी हा वाद आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनाच मिटवावा लागणार आहे.

बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासोबत व तेथील आमदार गोविंद गावडे यांच्या सोबत आमचे कार्यकर्ते काम करण्यास तयार नव्हते. उलट मगोपच्या ‘सिंह'' या निशाणीविरुद्ध गावडे यांनी अपमानास्पद शब्द वापरले. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत कधीही हातमिळवणी शक्य नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री सुदिन ढवळीकर (sudin dhavalikar) यांनी काल (शुक्रवारी) केले.

Sudin Dhavalikar, Govind Gaude
Goa Politics: खरी कुजबुज; ...म्हणून पालेकरांच्या हाती नारळ!

या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांकडे आमदार गावडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटेल आहे, की ढवळीकर यांनी निवडणुकीपूर्वी ती विधाने का केली नाहीत? भाजपसाठी (BJP) त्यांनी कधी काम केले आहे? दोन्ही बंधू माझ्यासोबत कधी होते? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. त्याशिवाय आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची गावडे यांनी भेट मागितली आहे. त्यामुळे आता या वादाचे निरसन करण्याचे किंवा त्यावर तोडगा काढण्याचे काम दोन्ही नेत्यांना करावे लागणार आहे.

Sudin Dhavalikar, Govind Gaude
Goa Politics: मैत्रीत 'दगा' की राजकारणाची 'मजा'? भाजपच्या बालेकिल्ल्यात मगोचा शिरकाव; युतीचे समीकरण धोक्यात!

निकालानंतर आरोप-प्रत्यारोप

निवडणूूक प्रचारात अपक्ष व गावडे समर्थकांत आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यावेळी मगो नेते त्या आरोप-प्रत्यारोपात कुठेच नव्हते. निकाल लागल्यानंतर अपक्ष उमेदवार सुनील जल्मी जिंकले आणि त्यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान आरोप, घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर नेत्यांचे मतप्रदर्शन सुरू झाले आणि वादाला तोंड फुडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com