Special Pilgrimage Trains
Special Pilgrimage TrainsDainik Gomantak

Goa Special Trains: गोमंतकीय भाविकांना 'रामलल्ला' साद घालणार! 3 जानेवारीपासून अयोध्या आणि वालंकिणीसाठी विशेष रेल्वे; 'मुख्यमंत्री देवदर्शन योजना' पुन्हा सुरु

Goa Mukhyamantri Dev Darshan Yojana: ज्‍येष्‍ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्‍यासाठी काही वर्षांपूर्वी राज्‍य सरकारने ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी मुख्‍यमंत्री देवदर्शन योजना सुरू केली.
Published on

पणजी: समाज कल्‍याण खात्‍यामार्फत सुरू करण्‍यात आलेल्‍या मुख्‍यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत येत्‍या ३ जानेवारीपासून गोमंतकीय जनतेला अयोध्‍येतील रामलल्लासह वालंकिणीचेही दर्शन घेता येणार आहे. ३ जानेवारीला अयोध्‍येसाठी तीन आणि वालंकिणीसाठी एक रेल्‍वे सोडण्‍यात येणार असून, इच्‍छुकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार असल्‍याची माहिती समाज कल्‍याण खात्‍याचे संचालक दीपक देसाई यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

ज्‍येष्‍ठ नागरिकांना (Senior citizen) मोफत देवदर्शन घडवून आणण्‍यासाठी काही वर्षांपूर्वी राज्‍य सरकारने ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी मुख्‍यमंत्री देवदर्शन योजना सुरू केली. सुरुवातीच्‍या टप्‍प्‍यात शिर्डी, पंढरपूर, वालंकिणी आदी ठिकाणी रेल्‍वे सोडण्‍यात आलेल्‍या होत्‍या. योजनेचा लाभ घेत राज्‍यातील हजारो ज्‍येष्‍ठ नागरिकांनी मोफत देवदर्शनाचा लाभ घेतला. त्‍यानंतर काही वर्षांपासून आर्थिक निधीची तरतूद न झाल्‍याने समाज कल्‍याण खात्‍याने ही योजना थांबवली होती. परंतु, सध्‍या सरकारने योजनेसाठी आवश्‍यक निधी दिल्‍याने येत्‍या ३ जानेवारी रोजी अयोध्या आणि वालंकिणी या दोन तीर्थस्‍थळांचा लाभ जनतेला मिळवून देण्‍याचा निर्णय खात्‍याने घेतला असल्‍याचे देसाई यांनी सांगितले.

Special Pilgrimage Trains
Goa Special Train: ख्रिसमस, न्यू ईयरनिमित्ताने गोव्यासाठी धावणार विशेष ट्रेन; पंजाब, दिल्ली, गुजरात मुंबईतून मडगाव गाठणार, बुकिंग सुरु

यावेळी योजनेत काही बदल करण्‍यात आलेले आहेत. योजनेचे अर्थ सुरुवातीला प्रत्‍यक्ष भरावे लागत होते. परंतु, यावेळी इच्‍छुकांना सहा ते सात दिवसांआधीपासून पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. यावेळी समाज कल्‍याण खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) यांच्‍या संयुक्त विद्यमाने योजना राबवण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

Special Pilgrimage Trains
Shravan Special Train: मडगावातून निघणार ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण यात्रा’; भारत गौरव ट्रेनने प्रवास, गोव्यातून चांगला प्रतिसाद

सुमारे सात कोटींचा येणार खर्च

मुख्‍यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत ३ जानेवारीला अयोध्‍येला (Ayodhya) तीन आणि वालंकिणीला एक अशा चार रेल्‍वे सोडण्‍यात येतील. या चार रेल्‍वेंच्‍या माध्‍यमातून सुमारे साडेतीन हजार नागरिकांना या तीर्थस्‍थळांचा लाभ घेता येणार असून, त्‍यासाठी सुमारे सात कोटींचा खर्च होणार असल्‍याचेही दीपक देसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com