Sarzora Railway Station Dainik Gomantak
गोवा

Sarzora Railway Station: रेल्वे स्टेशन झाल्यास परप्रांतीय वाढतील, गुन्हेगारी वाढेल! सारझोरातील स्थानिकांनी व्यक्त केली भीती

Sarzora Railway Station Oppose: सारझोरा येथे आज झालेल्या विशेष ग्रामसभेत कोकण रेल्वेने प्रस्तावित केलेल्या नवीन रेल्वे स्टेशनच्या स्थापनेला विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

Sameer Panditrao

Sarzora Railway Station Updates

मडगाव: सारझोरा येथे आज झालेल्या विशेष ग्रामसभेत कोकण रेल्वेने प्रस्तावित केलेल्या नवीन रेल्वे स्टेशनच्या स्थापनेला विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. यापूर्वी नेवरा गावातही नवीन रेल्वे स्टेशनला आक्षेप घेण्यात आला आहे.

सारझोरा हा कृषिप्रधान गाव असून ज्यामध्ये विस्तीर्ण भातशेती असून नारळाच्या बागायतीही आहेत. या भागात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील सारझोरा तलाव आहे, जो गोवा राज्य पाणथळ प्रदेश प्राधिकरणाने अधिसूचित केलेला भाग आहे. त्यामुळे हे स्टेशन बांधल्यास शेतीवर आणि पर्यावरणावर वाईट परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

नवीन स्टेशन झाल्यास येथे स्थलांतरितांचा ओघ वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या भागात अनधिकृत आणि अनैतिक व्यवहारांना चालना मिळू शकते आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. साहजिकच गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. कोकण रेल्वेने गेल्या महिन्यात सारझोरा, नेवरा आणि मये येथे पुढील तीन वर्षांत ३ नवीन रेल्वे स्टेशन्स बांधण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, सारझोरा येथे या नवीन स्टेशनला स्थानिकांनी विरोध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Ganja Seizure: पोलिसांना टीप मिळाली, निळी पिशवी उघडल्यावर विस्फारले डोळे; साखळीत मोठी कारवाई, गांजाचा साठा जप्त

Goa Crime: शेळ्यांच्या वादातून डोक्यावर, छातीवर केला चाकूने वार; 8 वर्षानंतर आरोपीला शिक्षा, 18 दिवसांचा कारावास

Sand Mining: वाळू उपसा प्रश्‍न! जीसीझेडएमएला 50 हजारांचा दंड; उत्तर सादर न केल्याने एनजीटीची कारवाई

Ind Vs NZ T20: 5व्या सामन्यापूर्वी मोठी बातमी! सॅमसनसाठी अखेरची संधी? वरुण चक्रवर्तीबाबतही संदिग्धता

Nayudy Trophy: 23 चौकार, 6 षटकार! गोव्याविरुद्ध दिवसात ठोकले द्विशतक; पंजाबचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT