Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : फातोर्डा येथील सखल भागात पूराची शक्यता; सरदेसाईंनी व्यक्त केली चिंता

बाणावली भागात वेस्टर्न बायपासचे बांधकाम सुरु आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बाणावली भागात वेस्टर्न बायपासच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे फातोर्डा येथील सखल भागात पूर येण्याची शक्यता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. बाणावलीचा भाग मुंगुल सारखा स्टिल्टवर न बांधता मातीचा भराव घालून बांधण्याचा निर्णय सभोवतालच्या भागासाठी धोका निर्माण करू शकतो अशी भीतीही सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.

सरदेसाई यांनी बांधकाम आराखड्याचे तात्काळ पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आणि सरकारला हा प्रकल्प स्टिल्टवर हाती घेण्याचे आवाहन केले. “या पर्यायी पध्दतीचा फायदा केवळ बाणावलीच्या लोकांना होणार नसून या निर्णयामुळे मुंगुलमधील सखल शेतातील भाग संभाव्य वाचवता येईल असे सरदेसाई म्हणाले.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन सरदेसाई यांनी फातोर्डा येथील जनतेला पुराचा धोका कमी करण्यासाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे हा विषय मांडू असे आश्वासन दिले आहे.

सरदेसाई म्हणाले, त्यांचे प्राथमिक लक्ष फातोर्डामधील सखल भागांचे रक्षण करणे असेल. बायपासचा फातोर्डा विभागातील रस्ता स्टिल्ट्सवर बांधला जात असला तरी, बाणावली येथील रस्ता मातीचे भराव घालून केल्याने पाण्याचा प्रवाह अडून हे पाणी मुंगुल येथील सखल भागात भरून पूर येण्याची दाट शक्यता आहे.

सरदेसाई यांनी या प्रकरणाची आणीबाणीची परिस्थिती संबंधित अधिकाऱ्यांना पटवून दिली असून साळ पाणलोट क्षेत्रातील विशेषत: फातोर्डा येथील भागात पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT