CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'रंगोत्सवाच्या निमित्ताने इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरा'! CM सावंतांचे आवाहन; बालकांसमवेत लुटला आनंद

Sanquelim Rangotsav 2026: रवींद्र भवन, साखळीतर्फे सलग दुसऱ्या वर्षी भव्य रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वा. सुरू झालेल्या या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: गोव्यातील होळी आणि रंगोत्सव हा अनोखा व उत्साहपूर्ण असतो. सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या आनंदाने यात सहभागी होतात. सार्वजनिक रंगोत्सवांमध्ये महिलांचा वाढता सहभाग पाहता त्यांचा आदर व सन्मान राखावा, तसेच या रंगोत्सवाच्या निमित्ताने इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

रवींद्र भवन, साखळीतर्फे सलग दुसऱ्या वर्षी भव्य रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वा. सुरू झालेल्या या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावर्षीच्या रंगोत्सवात खास डिजे संगीत, रेन डान्स, लहान मुलांसाठी कृत्रिम जलतरण तलाव आणि विविध दालनांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. केतकी पोरोब यांच्या मार्गदर्शनाखाली मुले व उपस्थितांसाठी विविध स्पॉट गेम्स घेण्यात आले. या उपक्रमांचा नागरिकांनी आनंद लुटला.

यावेळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, संचालक अमोल बेतकीकर, रविराज च्यारी, नगराध्यक्षा सिध्दी प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. रंग, आनंद आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधत साखळीतील रंगोत्सव जल्लोषात पार पडला.

मुलांसमवेत लुटला आनंद

सुमारे ११ वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी रंगोत्सवस्थळी उपस्थिती लावली. आगमन होताच उपस्थितांनी त्यांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत उत्सवात सहभाग घेतला. रेन डान्समध्ये नागरिकांसोबत ठेका धरल्यानंतर त्यांनी लहान मुलांच्या जलतरण तलावात जाऊन बालकांसमवेत आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'लुईस बर्जर'शी माझा संबंध नाही! चर्चिल आलेमाव यांचा पर्रीकरांवर खळबळजनक आरोप; ईडीची केस रद्द झाल्यावर दिली प्रतिक्रिया

Goa Parasailing Accident Video: गळ्याभोवती दोरी आवळली, श्वास कोंडला, मृत्यू समोर दिसला! गोव्यातील पॅरासेलिंगचा जीवघेणा थरार व्हायरल; महिलेनं सांगितली आपबिती

Fatorda Illegal Casinos: फाताेर्ड्यातील कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचं 'अभय'! आमदार सरदेसाईंचा घणाघात; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

IPL 2026 Points Table: आयपीएलचा क्लायमॅक्स सुरु! दिल्लीला पराभवाची धूळ चारत चेन्नई पुन्हा फॉर्ममध्ये, गुणतालिकेत उडवली खळबळ; मुंबई-केकेआरचं पॅकअप?

'ती' 16 बेटे गोव्याचीच! मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाचा दावा फेटाळला; महसूल सचिवांना दिले तातडीने चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT