Fatorda Illegal Casinos: फाताेर्ड्यातील कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचं 'अभय'! आमदार सरदेसाईंचा घणाघात; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

Fatorda Illegal Casinos: फातोर्डा मतदारसंघात काही ठिकाणी मिनी कॅसिनो व जुगारअड्डे सुरू असून त्यांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
Fatorda Illegal Casinos
Fatorda Illegal CasinosDainiak Gomantak
Published on
Updated on

मडगाव: फातोर्डा मतदारसंघात काही ठिकाणी मिनी कॅसिनो व जुगारअड्डे सुरू असून त्यांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. या बेकायदेशीर प्रकारांवर त्वरित कारवाई करून ते बंद करावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरदेसाई यांनी सांगितले की, विराज वाडेकर यांनीही यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली होती. मात्र तक्रारीनंतरही कारवाई न होता उलट धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. या कॅसिनो आणि जुगारामुळे युवकांवर वाईट परिणाम होत

Fatorda Illegal Casinos
MLA Disqualification: 7 आमदारांना उत्तरासाठी 6 आठवडे! अपात्रता याचिकांतील मुद्दे ‘त्‍या’ निर्णयामुळे निकालात जमा; कामतांचे स्पष्टीकरण

असून त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. यासोबतच फातोर्ड्यात रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांकडून दादागिरी, चोरीच्या दुचाक्यांचा वापर अशा प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचे त्यांनी नमूद केले. फातोर्डा पोलिस स्थानकावर कायमस्वरूपी पोलिस निरीक्षक नेमण्याची गरज असल्याचे सांगत, सध्या हा ताबा सांगे येथील निरीक्षकाकडे असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली. या सर्व बाबींबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com