Goa Parasailing Accident Video: गळ्याभोवती दोरी आवळली, श्वास कोंडला, मृत्यू समोर दिसला! गोव्यातील पॅरासेलिंगचा जीवघेणा थरार व्हायरल; महिलेनं सांगितली आपबिती

Nutritionist Sushmitha Viral Instagram Post: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका महिलेला पॅरासेलिंग करताना अत्यंत भयानक अनुभवाचा सामना करावा लागला.
Nutritionist Sushmitha Viral Instagram Post
Goa Parasailing Accident VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Parasailing Accident Video: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका महिलेला पॅरासेलिंग करताना अत्यंत भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. सुष्मिता नावाच्या एका महिलेने तिच्या इंस्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून हा आनंददायी अनुभव तिच्यासाठी मृत्यूचा सापळा कसा ठरला असता याविषयी सांगितले. सुष्मिताच्या या पोस्टला आतापर्यंत 2.3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

सुष्मिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, "गोव्यात मजेसाठी सुरु झालेला पॅरासेलिंगचा अनुभव थेट समुद्राच्या मध्यभागी संघर्षात बदलला. मी पाण्यात पडले, दोरी माझ्या गळ्याभोवती आवळली गेली आणि त्या क्षणी केवळ भीती आणि शांतता होती. जेव्हा तुम्हाला जाणीव होते की आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही, ती भावना कोणताही कॅमेरा टिपू शकत नाही." सुष्मिताने पुढे नमूद केले की, ती सुदैवी होती म्हणून कोणीतरी मदतीला आले आणि तिचा जीव वाचला. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अशी दुसरी संधी मिळतेच असे नाही, असा इशाराही तिने दिला.

Nutritionist Sushmitha Viral Instagram Post
Viral Video: जादू की कला? मलिंगा, बुमराहची स्टाईल पडेल फिकी, सोशल मीडियावर रंगली 'या' 'मिस्ट्री' बॉलरचीच चर्चा; व्हिडिओ एकदा बघाच

या घटनेनंतर सुष्मिताने इतर पर्यटकांना (Tourists) सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही वॉटर स्पोर्टला सुरुवात करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेची नीट तपासणी करा, प्रश्न विचारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण काही अनुभव केवळ आठवणी राहत नाहीत, तर ते आयुष्यभरासाठी एक मानसिक धक्का देतात, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

Nutritionist Sushmitha Viral Instagram Post
Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

या व्हिडिओवर सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये बॅग्राऊंडला ऐकू येणाऱ्या हसण्याच्या आवाजावर एका युजरने आक्षेप घेत म्हटले की, "कोणाच्या तरी जिवाशी खेळ सुरु असताना असा हसण्याचा आवाज येणे हे लोकांच्या असंवेदनशीलतेचे लक्षण आहे." दुसऱ्या एका युजरने भारतात अशा प्रकारचे साहसी खेळ पूर्ण सुरक्षेशिवाय आयोजित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. पॅरासेलिंगमध्ये अशा प्रकारे पाण्यात बुडवणे अत्यंत धोकादायक असल्याचेही काहींनी नमूद केले. काही नेटकऱ्यांनी सुष्मिताच्या धाडसाचे कौतुक केले असून जनजागृती केल्याबद्दल तिचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com