'लुईस बर्जर'शी माझा संबंध नाही! चर्चिल आलेमाव यांचा पर्रीकरांवर खळबळजनक आरोप; ईडीची केस रद्द झाल्यावर दिली प्रतिक्रिया

Bombay High Court Goa verdict:लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही.
Bombay High Court Goa verdict
Bombay High Court Goa verdictDainiak Gomantak
Published on
Updated on

मडगाव: लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. राजकीय डावपेचांचा भाग म्हणून दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला मुद्दाम या प्रकरणात गोवले, असा आरोप माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व आलेमाव यांच्याविरोधातील ईडीची केस रद्द केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी लुईस बर्जर कंपनीला कधी पाहिले किंवा भेटलोही नाही. हा व्यवहार मी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वीच झाला होता, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.

Bombay High Court Goa verdict
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

या प्रकरणातील खरे दोषी मोकाट राहिले, मात्र मी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने पर्रीकर सरकार कोसळले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी मला अटक करण्यात आली, असा दावा आलेमाव यांनी केला. राजकारणात आल्यानंतरच आपल्यावर विविध प्रकरणे लावली गेली, असे सांगत कोकणी राजभाषा आंदोलनावेळी राष्ट्रीय ध्वजा चा अपमान केल्याचा आरोपही खोटा ठरल्याचे चर्चिल यांनी नमूद केले. त्या प्रकरणात पोलिसांना न्यायालयात आरोप सिद्ध करता आले नाहीत. असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com