water saving project goa Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: साखळी रवींद्र भवनतर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाचे उद्घाटन; 'जल संवर्धन' प्रकल्प राबवणारी पहिली सरकारी संस्था

Ravindra Bhavan Sanquelim: साखळी रवींद्र भवनतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा व बोअरव्हेल या प्रकल्पाचा शुभारंभ अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला

Akshata Chhatre

साखळी: साखळी रवींद्र भवनतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा व बोअरव्हेल या प्रकल्पाचा शुभारंभ अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. ३० एप्रिल रोजी मुख्यमंत्री व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यानंतर आता रवींद्र भवनच्या समोरील खुल्या जागेत हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

कसा असेल प्रकल्प?

या प्रकल्पात पावसाचे पाणी साठविण्यासाठी एक विहीर तयार केली जाणार जाईल व त्याच्याच बाजूला बोअरव्हेल तयार करून हे पाणी विविध ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये पंपींग करून रवींद्र भवनमध्ये वापरात आणले जाणार आहे.

हा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून इतरही सरकारी अस्थापनांनी अशी योजना राबवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले. साखळीत सरकारी अस्थापनामध्ये असा प्रकल्प साकारणारे रवींद्र भवन हे पहिले अस्थापन आहे.

"निसर्गाच्या सुरक्षेप्रती कार्य करा"

राज्यातील भूजलसाठा कमी होण्याच्या मार्गावर आहे, काही लोकं पाण्याचा गैरवापर करतायत किंवा पाणी प्रदूषित करतायत. अशात रवींद्रभवन साखळी तर्फे सुरु करण्यात आलेला हा उपक्रम वाखण्याजोगा आहे. सध्या साखळीत चंदनाची झाडं लावण्यात आलीये.

पर्यावरण पूरक अशा या गोष्टी सर्वांनी अंमलात आणाव्यात आणि निसर्गाच्या सुरक्षेप्रती कार्य करावं असं मुख्यमंत्री म्हणालेत. पावसाचं पाणी वाया जाण्यापेक्षा तेच पाणी साठवून ते वापरात आणता यावं म्हणून रवींद्र भवन साखळीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT