Sanquelim: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 10 हजार सरकारी नोकऱ्या देणार; 'संपूर्ण गोव्याची जबाबदारी माझी', साखळीत फुंकले रणशिंग

CM Pramod Sawant: राज्य सरकारने कर्मचारी भरती आयोग व गोवा सार्वजनिक सेवा आयोग निर्माण करून गोमंतकीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: राज्य सरकारने कर्मचारी भरती आयोग व गोवा सार्वजनिक सेवा आयोग निर्माण करून गोमंतकीयांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या दोन वर्षांत सरकारी खात्यातून थेट पाच हजार पदे भरण्यात येतील. तसेच मानव संसाधन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सोसायटी, वीज खाते मिळून सुमारे दहा हजार पदे येणाऱ्या काळात भरली जातील.

त्यासाठी गोव्यातील युवकांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आतापासूनच सुरू करावी. तरीही युवकांनी केवळ सरकारी नोकरीवरच अवलंबून न राहता खासगी क्षेत्रातही मिळणाऱ्या रोजगाराचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले.

गोव्यात आज भाजपला मिळत असलेले यश व होत असलेली कामे यावरून येणाऱ्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप निश्चितच बाजी मारणार आहे. या निवडणुकीची तयारी आजच्या कार्यकर्ता मेळावातूनच सुरू झालेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

साखळी येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, साखळी भाजप मंडळ समिती अध्यक्ष रामा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, उत्तर गोवा सदस्य स्वाती माईणकर, सुभाष मुळीक, महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, विविध पंचायतींचे सरपंच व इतरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, भाजप हा एक शिस्तबद्ध व पद्धतशीर काम करणारा पक्ष असून निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरच लोकांच्या संपर्कात राहणारा पक्ष नाही. सदैव लोकांच्या लहान मोठ्या कामांचा पाठपुरावा करून लोकांना विविध सोयी व योजना मिळवून देण्यात भाजपचे कार्यकर्ते धन्यता मानतात.

याच कार्यकर्त्यांच्या बळावर येणाऱ्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असून साखळीत आजचा हा कार्यकर्ता मेळावा म्हणजेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची पहिली जाहीर सभा आहे. म्हणजेच निवडणुकीची जबाबदारी ही नवीन मंडळ समितीवर असून सर्व कार्यकर्त्यांचे कार्य व जबाबदारी आजपासूनच सुरू झाली आहे.

साखळी मतदारसंघातील लोक आपणास ''सर'' म्हणून हाक न मारता ‘दोतोर’ या आपुलकीच्या नावाने हाक मारतात. म्हणजेच साखळीतील जनतेच्या मनात आपले स्थान काय आहे याची प्रचिती आपणास सदैव मिळते.

CM Pramod Sawant
Goa BJP: '2027 ला 27 जागा जिंकून भाजपला बळकट करू', पर्ये मेळाव्यात विश्वजित राणेंचा निर्धार; ‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा

याच लोकांच्या बळावर त्यांचा स्वाभिमान उंच ठेवण्यासाठी आपण गोव्यात मुख्यमंत्री या नात्याने उत्कृष्ट कामगिरी बजाऊ शकतो. मी केवळ साखळीचा मुख्यमंत्री नसून सर्व गोव्याची जबाबदारी माझी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या मेळाव्यात उपस्थित इतरांचीही भाषणे झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

CM Pramod Sawant
BJP MGP alliance Goa: भाजप - मगोची युती कायम राहणार? ढवळीकर बंधुंना बी. एल. संतोष यांनी दिल्लीत काय आश्वासन दिले?

पक्षावर व नेत्यांवर विश्वास ठेवा : दामू नाईक

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी, भाजपचा कार्यकर्ता हा सर्वात मजबूत कार्यकर्ता असून या कार्यकर्त्याच्या जोरावर आजपर्यंत भाजपने अनेक आमदार, मंत्री, खासदार व सरकारेही निवडून आणली आहेत. वरिष्ठ कार्यकर्ते तसेच नेते यांच्यापासून घडलेले अनेक कार्यकर्ते आज मोठ्या आशेने या पक्षाकडे व सरकारकडे बघत आहेत. या सर्वांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष व सरकारही कार्यरत आहेत. परंतु कार्यकर्त्यांमधील विश्वास व एकतेची भावना ही कधीही कमी होऊ देऊ नका. सदैव एकमेकांना विश्वास घेऊन तसेच आपल्या पक्षावर व नेत्यावर विश्वास ठेवून काम केल्यास येणाऱ्या २५ वर्षात भाजपला कोणीही हात लावू शकत नाही, असे प्रतिपादन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com