Pramod Sawant: 'आरोग्य सांभाळा, तीच मला भेट', CM सावंतांनी बर्थडे सेलिब्रेशन टाळले; साखळीत मेगा आरोग्य शिबिर

Goa CM Pramod Sawant Birthday: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्यांप्रति दुखवटा असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वाढदिवस साजरा करणारे सर्व कार्यक्रम रद्द केले.
Goa CM Pramod Sawant Birthday
Health CampDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिनी गुरुवारी (२४ एप्रिल) राज्यभरातून चाहत्यांनी त्यांच्यावर विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव केला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिन 'सेलिब्रेशन' रद्द करण्यात आले असले तरी विविध ठिकाणी आरोग्य सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचा शेकडो जणांनी लाभ घेतला.

'आपले आरोग्य निरोगी राखा, हीच आपणास गोमंतकीयांकडून मोठी भेट', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. डॉ. सावंत यांनी आज साखळी येथील रवींद्र भवनात मेगा आरोग्य शिबिराला भेट दिली व सर्व डॉक्टरांचे या सेवेबद्दल आभार मानले.

यावेळी साखळीतील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व चाहत्यांनी गर्दी होती.

Goa CM Pramod Sawant Birthday
Goa Made Liquor: जंगलात लपवून ठेवली दारु; चिपळूणमध्ये गोवा बनावटीचे 21.66 लाख किंमतीचे मद्य जप्त

केक, पुष्पगुच्छांना नकार, केवळ हस्तांदोलन

१) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्यांप्रति दुखवटा असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वाढदिवस साजरा करणारे सर्व कार्यक्रम रद्द केले. तरीही आज साखळी हाऊसिंगबोर्ड येथील निवासस्थानी सकाळीच मोठ्या संख्येने डॉ. सावंत यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

२) अनेकांनी बर्थडे केकही आणले होते परंतु मुख्यमंत्र्यांनी केक कापण्यास सरळ नकार दिला. तसेच पुष्पगुच्छ आणण्यास लोकांना मज्जाव केला. त्यामुळे अनेकांनी पुष्पगुच्छ मागे ठेवत केवळ हस्तांदोलन करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

३) वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सकाळी हरवळेतील श्री देव रुद्रेश्वर, दत्तवाडी साखळीतील श्री दत्तात्रेयांचे, सुर्लतील देवतांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक आमदारांनी भेटी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com