Municipality of Sanquelim  Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim Municipality Election 2023: साखळी नगरपालिकेसाठी दोन्ही गटांचे बहुतांश उमेदवार निश्चित

काही ठिकाणी वाटाघाटी; अजून एकही अर्ज नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Sankhali Municipal Council Election 2023 : साखळी पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झालेला नाही. या निवडणुकीत उतरणारा भाजप पॅनल व ‘टुगेदर फॉर साखळी’ या दोन्ही गटांकडून बहुतेक प्रभागांमधील उमेदवार निश्चित झालेले आहेत. तरीही काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने वाटाघाटी सुरू आहेत.

या दोन्ही गटांतर्फे येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरूवारी किंवा नंतरच्या दिवसांमध्ये हे उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज सादर करतील.

साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झालेली आहे.

सर्व प्रभागांमधील उमेदवारांमध्ये समेट घडविण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी संघटित कार्य करण्याचे सर्वांनी ठरविले आहे.

ज्या प्रभागांमध्ये उमेदवारांमध्ये धुसफूस चालू आहे, तेथेही आमचे कार्यकर्ते विरोधात जाणार नाहीत, तर आमच्याच उमेदवाराला विजयी करण्यासाठी वावरतील, असा विश्वास नगरसेवक दयानंद बोर्येकर व आनंद काणेकर यांनी व्यक्त केला.

‘टुगेदर फॉर साखळी’ची व्यूहरचना

गेले दोन कार्यकाळ साखळी नगरपालिकेवर असलेली आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी सत्ताधारी ‘टुगेदर फॉर साखळी’ या गटाने कंबर कसली आहे.

सर्व प्रभागांमध्ये नियोजनबद्ध व्यूहरचना आखण्‍यात हा गट करण्यात मग्न आहे. त्‍यांच्‍या एकापाठोपाठ एक बैठका सुरू आहेत.

प्रभाग फेररचना व आरक्षणामुळे या गटासमोर आव्हान उभे असले तरी कोणी कोणत्या प्रभागात निवडणूक लढवावी, तसेच कोणी कोणासाठी काम करायचे याबाबत चर्चा सुरू आहे.

या गटाचेही अर्धेअधिक उमेदवार निश्चित झालेले असून काही ठिकाणी उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. लवकरच त्याही प्रभागांमधील उमेदवार निश्चित करण्‍यात येतील, असे नगराध्यक्ष राजेश सावळ व प्रवीण ब्लेगन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT