National Party: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीसह 'या' पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे.
Nationalist Congress Party
Nationalist Congress PartyDainik Gomantak
Published on
Updated on

National Party: निवडणूक आयोगाने सोमवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि सीपीआय आता प्रादेशिक पक्ष म्हणून राहतील.

तर, दिल्ली, गोवा (Goa), पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष घोषित करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सत्तेत आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू हेच राहणार आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावून घेतला गेला आहे. नागालँडमध्ये लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे. बंगाल आणि त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसला राज्य पक्षाचा दर्जा कायम राहील. तर टिपरा मोथा पक्षाला त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.

Nationalist Congress Party
Tamil Nadu: '...तुझी जीभ कापून टाकेन', काँग्रेस नेत्याची न्यायाधीशांनाच धमकी

अशा प्रकारे भाजप, काँग्रेस (Congress), सीपीआय (एम), बहुजन समाज पक्ष (बसपा), नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि आप आता राष्ट्रीय पक्ष आहेत.

सोमवारी जारी केलेल्या आदेशात आयोगाने उत्तर प्रदेशातील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए, पुद्दुचेरीतील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला.

एनसीपी, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com