Sanquelim Municipal Council Swachhta Survey 2025 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: साखळी पालिका स्वच्छतेत अव्वल! 12 प्रभागांत राबविले विविध उपक्रम; दिल्लीत होणार पुरस्कार प्रदान

Sanquelim municipality ranking: केंद्रीय गृहनिर्माण नगर मंत्रालयातर्फे देशभर करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात गोवा राज्यात राज्य पातळीवर साखळी नगरपालिका अव्वल ठरली आहे.

Sameer Panditrao

साखळी: केंद्रीय गृहनिर्माण नगर मंत्रालयातर्फे देशभर करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात गोवा राज्यात राज्य पातळीवर साखळी नगरपालिका अव्वल ठरली आहे. या मंत्रालयाचा ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५’ साखळी नगरपालिकेला जाहीर झाला असून १७ जुलै रोजी दिल्ली येथील उद्योग भवनात विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीपासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू होते. साखळी नगरपालिकेचे नवीन पालिका मंडळ स्थापन झाल्यानंतर नगरपालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. माजी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांच्या कार्यकाळातही साखळी नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्टतेचा पुरस्कार पटकावला होता.

तर यावर्षीही या नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘अव्वल’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यमान नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी गेल्या वर्षी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविलेले आहे. नगरपालिका कामगारांमध्ये कामाचा विश्वास निर्माण करून नगरपालिकेच्या सर्व १२ प्रभागांमध्ये विविध प्रकारे स्वच्छतेचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

रस्त्याशेजारी तसेच खुल्या जागेत असणारा कचरा कमी व्हावा तसेच लोकांनीही सहकार्य करीत आपला भाग स्वच्छ राखण्यासाठी जागृती करण्यात आली होती. या अभियानाला साखळीतील नागरिकांनीही योग्य प्रतिसाद दिला असल्याने साखळी नगरपालिका क्षेत्रात कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे सर्व निकष स्वच्छ सर्वेक्षणात प्रभावी ठरल्यानंतर नगरपालिकेला राज्य पातळीवर उत्कृष्ट नगरपालिका पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पुरस्काराचे श्रेय सफाई कामगारांना

साखळी नगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व सहकारी नगरसेवक तसेच विशेषतः साखळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाचे फलित आहे. या पुरस्काराचे श्रेय हे पूर्णपणे याच सफाई कामगारांना जाते. या अभियानात नगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या हाकेला साखळीतील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नगरपालिकेची ही मोहीम आतापर्यंत यशस्वी करण्यात आम्हाला यश आले आहे, असे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

साखळी नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे. स्वच्छ व सुंदर साखळीसाठी नगरपालिकेबरोबरच लोकांचाही सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. वेळोवेळी आपण तसेच नगरपालिकेनेही दिलेल्या हाकेला लोकांनी सकारात्मक साथ दिली आहे. अशीच साथ कायम राहिल्यास शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महापौर-आयुक्त १७ रोजी स्वीकारणार राष्ट्रपती पुरस्कार

शहर स्वच्छ सर्वेक्षणात पणजीला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारण्यासाठी महापौर रोहित मोन्सेरात आणि आयुक्त क्लेन मेदेरा हे जाणार आहेत. नवी दिल्ली येथे १७ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार महापौर व आयुक्त स्वीकारतील. पणजीतील स्वच्छता आणि शाश्वत शहरी विकासासाठीची वचनबद्धता अधोरेखित होत आहे. पणजी शहर स्वच्छतेला खऱ्या अर्थाने हातभार लागला आहे तो स्मार्ट सिटी मिशनचा. स्मार्ट सिटी मिशनमुळे पणजीतील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. त्याशिवाय बंद गटार व्यवस्थेचे काम झाले. शहरातील रस्ते झाल्याने आणि पणजी महानगरपालिकेने स्वच्छतेवर भर दिल्याने ते पुरस्कारापर्यंत पोहोचू शकले आहेत.

स्मार्ट सिटीच्या कामांच्या पूर्णत्वाच्या बाबतीत पणजी मागे असली तरी महानगरपालिकेने मात्र आपल्या कचरा उचलण्याच्या कामात चांगली कामगिरी बजावल्याने स्वच्छ सर्वेक्षणात शहर अग्रस्थानी पोहोचण्यासाठी आवश्यक गुणांकन प्राप्त करू शकले, असे दिसते. गतवर्षी झालेल्या सर्वेक्षणात हा पुरस्कार जाहीर झाला होता, त्यामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा आता येत्या १७ रोजी नवी दिल्लीत पार पडणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महापौर व आयुक्त जाणार अाहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Vijayanagara Empire Goa: राजा देवराय याने 'गोवा' आपल्या आधिपत्याखाली आणला, विजयनगर साम्राज्याचा इतिहास

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Beti Ferry Boat: 'बेती' फेरीबोट प्रकरणाबाबत धूसरता; सरकारकडे चौकशी अहवाल सादर, पण 'ते' कारण अद्याप गुलदस्त्यात

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT