Sanquelim Municipal Council Election Result Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election Result: मुख्यमंत्र्यांच्या साखळीत भाजप निर्विवाद! 'या' उमेदवारांची बाजी; Detailed Result

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत.

Kavya Powar

Sanquelim Municipal Council Election Result: साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी वाढलेली मतदानाची टक्केवारी पाहता यावेळी कोण बाजी मारणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. साखळी पालिकेच्‍या 12 प्रभागांसाठी भाजप व ‘टुगेदर फॉर साखळी’ या दोन गटांमध्ये चुरस होती.

काल शुक्रवारी झालेल्या मतदानावेळी दोन्ही गटाचे उमेदवार हे मोठ्या आत्मविश्वासाने वावरताना दिसले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार :

वॉर्ड क्र. 1 : यशवंत माडकर

वॉर्ड क्र. 2 : निकिता नाईक

वॉर्ड क्र. 3 : सिद्धी परब

वॉर्ड क्र. 4 : रश्मी देसाई

वॉर्ड क्र. 5 : प्रवीण ब्लेगन

वॉर्ड क्र. 6 : विनंती पार्सेकार

वॉर्ड क्र. 7 : ब्रम्हानंद देसाई

वॉर्ड क्र. 8 : रियाज खान (बिनविरोध)

वॉर्ड क्र. 9 : आनंद काणेकर

वॉर्ड क्र. 10 : दयानंद बोर्येकर

वॉर्ड क्र. 11 : दीपा जल्मी

वॉर्ड क्र. 12 : अंजना कामत

Sanquelim Municipal Council Election Result

या निवडणुकीत ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्र. 5 मधील उमेदवार प्रवीण ब्लेगन सोडता यापैकी कुणीही निवडून आलेले नाही. धर्मेश सगलानी यांचाही दारुण पराभव झाला आहे.

वॉर्ड क्र. 1 ते 4 आणि 6 ते 12 मधील सर्व विजयी उमेदवार हे भाजप गटाचे असल्याने साखळीमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT