CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: गोव्यात सरकारी नोकरीसंदर्भात CM प्रमोद सावंतांची घोषणा; कोणतं प्रमाणपत्र असेल बंधनकारक?

Sanquelim Job Fair 2025: रविंद्र भवनात आज (शुक्रवार, ७ मार्च) भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.

Sameer Amunekar

साखळी: रविंद्र भवनात आज (शुक्रवार, ७ मार्च) भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांत अनेक नोकऱ्या उपलब्ध असून, या संधीचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय. यासोबतच त्यांनी सरकारी नोकरीसंदर्भातही महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारी नोकरीसाठी यापुढे एक प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय नोकरीत प्राधान्य मिळणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित केलं. त्यांनी सांगितलं की, राज्य सरकारच्या इंटर्नशिप योजनेंतर्गत अनेक नामांकित कंपन्या चांगल्या नोकऱ्या प्रदान करत आहेत. त्यामुळं तरुणांनी या संधीचे सोनं करावं आणि आपल्या करिअरला योग्य दिशा द्यावी.

रोजगार मेळाव्यात माहिती तंत्रज्ञान, उत्पादन, पर्यटन, बांधकाम, आरोग्यसेवा आणि अन्य क्षेत्रांतील कंपन्या सहभागी होत आहेत. या कंपन्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांवर भरती करणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. यापुढे सरकारी नोकऱ्यांसाठी खासगी अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असेल. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सरकारी नोकऱ्यांसाठी संबंधितांचा विचार केला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारच्या इंटर्नशिप योजनेंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध नोकऱ्यांसाठी तरुणांनी अर्ज करावा आणि आवश्यक अनुभव मिळवावा, असे आवाहन त्यांनी केलं.

तरुणांसाठी सुवर्णसंधी

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र सोबत आणावे. मेळाव्यादरम्यान उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार असून, निवड झालेल्यांना तत्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी हा रोजगार मेळावा एक उत्तम संधी ठरणार आहे. नामांकित कंपन्यांसोबत थेट संवाद साधण्याची आणि नोकरी मिळवण्याची संधी मिळणार असल्यानं मोठ्या संख्येनं तरुणांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT