Dr. Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

Sanquelim News : विद्यार्थ्यांनी गुणात्मक शिक्षण घ्‍यावे : डॉ. प्रमोद सावंत

येणाऱ्या काळात साई नर्सिंग इन्स्टिट्यूट नर्सिंग क्षेत्रातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कोर्स उपलब्ध करणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim News : दहावी-बारावीचे शिक्षण घेऊन घरी बसण्यापेक्षा आपल्या अंगातील कुशलतेला वाव द्या. गुणात्मक शिक्षण घेऊन भविष्यातील संधींच्या दिशेने झेप घ्या. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या कार्यक्रमाअंतर्गत कुशलतेला वर आणत स्वतः स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनण्याचे ध्येय ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले. येणाऱ्या काळात साई नर्सिंग इन्स्टिट्यूट नर्सिंग क्षेत्रातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कोर्स उपलब्ध करणार आहे.

राज्यात आयुष इस्पितळ झाल्यापासून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासत आहे, असेही ते म्‍हणाले.सेझा (वेदान्‍ता) कंपनीतर्फे साखळीतील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटला सीएसआर उपक्रमाअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्‍यात आले. रवींद्र भवनाच्‍या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सेझा कंपनीचे सीईओ नवीन जाजू, डब्‍ल्‍यूएबीचे सीईओ सप्तेश सरदेसाई, ईएसजीच्या प्रमुख लीना वेरेकर, साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर आणि मान्‍यवरांची उपस्थिती होती.

राज्यात आयुष इस्पितळ झाल्यानंतर या क्षेत्रात मनुष्यबळाची गरज वाढली आहे. त्‍यामुळे युवकांनी पुढे यायला हवे. सरकार वेलनेस पर्यटनही पुढे नेण्याच्या तयारीत आहे. युवकांनी अशा अभ्यासक्रमात प्रवेश करून आपले भविष्य साधावे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे इमारत बांधकाम सुरू आहे. भविष्यात सरकारी अनुदान मिळाल्यास येथील कोर्स कमी शुल्कात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

‘सेझा’चे सीईओ नवीन जाजू यांनी सांगितले की, कंपनीतर्फे सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. सामाजिक व पर्यावरणीय सलोखा सदैव राखण्याचे काम कंपनी करीत आहे. या कामात सरकारचेही सहकार्य लाभत आहे. दरम्‍यान, कंपनीतर्फे सीएसआर पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच साई नर्सिंग इन्स्टिट्यूटला आयएसओ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. पांडुरंग कुट्टीकर यांनी इन्स्टिट्यूटची माहिती दिली. लीना वेरेकर यांनी आभार मानले.

‘सेसा’तर्फे साखळीत पर्यावरण संवर्धन

न्हावेली-आमोणा या भागात कार्यरत असलेल्या ‘सेझा’ (वेदान्‍ता) या खाण कंपनीतर्फे पर्यावरण संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविले जात आहेत. या कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणावरच अनेकवेळा लोक प्रश्‍‍न उपस्‍थित करीत असतात. आता कंपनीने न्हावेली गावात मत्स्यपैदास वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करताना ‘चोणकुल’ या माशाची अंडी व पिल्ले पैदास करण्याचे काम हाती घेतले आहे. आमोणा येथील मुख्य कार्यालयाच्या परिसरात विविध जातींच्या कासवांचे पालन केले आहे. त्याचबरोबर साखळी मतदारसंघातील सर्व भागांमध्ये पर्यावरणीय बाबतीत भरीव काम करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT