Sanquelim News: तडीपारांना साखळीत आश्रय नको

नगरसेवक आक्रमक: पोलिसांकडून जितेंद्र, रमेश यांना अटक
Police
PoliceDanik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim News एका क्षुल्लक कारणावरून साखळीतील एका नगरसेवकाच्या भावाशी भांडण उरकून काढत त्यांच्यावर दमदाटी करणाऱ्या काणकोण येथून तडीपार करण्यात आलेल्या दोघांना साखळीत आश्रय नको, म्हणत साखळीतील नगरसेवक आक्रमक झाले.

नगरसेवकांनी डिचोली पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. साखळीत दहशत माजविण्यास सुरुवात केलेल्या या दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना साखळीतून हाकलावे, अशी मागणी साखळीतील नगरसेवकांनी डिचोली पोलीस स्थानकात केली.

Police
कुंकळ्ळीची क्रांतिगाथा अभ्यासक्रमात

जितेंद्र नागाप्पा अल्लाली (वय 29) व रमेश उर्फ रॉकी अल्लाली अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळ भाटपाल, श्रीस्थळ काणकोण येथील आहेत. सध्या ते वसंतनगर येथे बाबाजान यांच्या घरी भाड्याने राहत आहेत.

या दोघांविरोधात नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक यशवंत माडकर, रियाझ खान, दयानंद बोयेकर व ब्रह्मानंद देसाई या सहा नगरसेवकांनी तक्रार नोंदवली आहे. त्यांना डिचोली पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक केली.

Police
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात आल्यावर सगळ्यात आधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा आजच्या ताज्या किमती

रूद्रेश्वर कॉलनी येथील जंक्शनवर घडलेल्या एका किरकोळ अपघातात एका नगरसेवकाच्या चारचाकीला एका महिलेची दुचाकी लागली होती. ते प्रकरण तेथेच आपापसात मिटविण्यात आले होते.

तरीही वरील जितेंद्र अल्लाली व रमेश अल्लाली यांनी नगरसेवकाच्या भावाच्या अंगावर धावून जात त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचीही अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता सदर दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतले असून काणकोण येथून त्यांना तडीपार केल्याची माहिती समोर आली.

Police
Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

साखळी शहर हे शांत व स्वच्छ प्रतिमेच्या लोकांचे आहे. या शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना थारा नाही. त्यांना यापुढे साखळीत वास्तव्य करण्यास देऊ नये, अशी मागणी पोलीस निरिक्षकांकडे करण्यात आली आहे, असे नगरसेवक यशवंत माडकर यांनी सांगितले.

जामिनावर सुटका-

साखळीतील नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात डिचोली पोलीस स्थानकात तक्रार सादर केली होती. साखळीत गुन्हेगार प्रवृत्ती व तडीपार व्यक्तींचे वास्तव्य नको. त्यांना साखळीत रहायला देऊ नये. त्यांना येथून बाहेर हाकलावे.

त्यांना साखळीत राहायला दिल्यास नाइलाजास्तव साखळीकरांना कायदा हातात घ्यावा लागणार, असा स्पष्ट इशाराच सदर तक्रारीत देण्यात आला.

नगरसेवकाच्या भावाशी उरकून काढलेल्या भांडणाचीही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून डिचोली पोलिसांनी जितेंद्र व रमेश यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com