ISL 2026: चुरशीचा सामना सुटला बरोबरीत! FC Goa ने पंजाबला रोखले गोलबरोबरीत; एक गुण खात्यात

FC Goa Vs Punjab: सामन्याच्या उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळलेल्या पंजाब एफसीला पिछाडीवरून १-१ गोलबरोबरीत रोखून गुण मिळविल्याचे समाधान एफसी गोवा संघाला लाभले.
FC Goa Vs Punjab
FC Goa Vs PunjabDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa vs Punjab FC Recap : सामन्याच्या उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळलेल्या पंजाब एफसीला पिछाडीवरून १-१ गोलबरोबरीत रोखून गुण मिळविल्याचे समाधान एफसी गोवा संघाला लाभले, पण संधी गमावल्याची सलही राहिली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना सोमवारी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

पंजाब एफसीचा नायजेरियन आघाडीपटू न्सुन्गुसी एफ्फिओंग याने २७व्या मिनिटास संघाला आघाडी मिळवून देणारा शानदार गोल डाव्या पायाच्या फटक्यावर केला. विश्रातीनंतर लगेच ४८व्या मिनिटास न्सुन्गुसी यालाच रेड कार्ड मिळाल्यामुळे पंजाब एफसीचा एक खेळाडू कमी झाला. नायजेरियन खेळाडू व एफसी गोवाचा पॉल मोरेनो एकमेकांना भिडले.

यावेळी न्सुन्सुगी याने मोरेनो याला डोक्याने ढुशी (हेड बट) दिली. या कारणास्तव रेफरीने पंजाब एफसीच्या आघाडीपटूस थेट कार्ड दाखविले. त्यामुळे बाकी ४२ मिनिटे यजमान संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्याचा लाभ एफसी गोवास मिळाला.

ब्रायसन फर्नांडिसच्या शानदार असिस्टवर सर्बियन देयान द्राझिच याने ५३व्या मिनिटास एफसी गोवास १-१ अशी बरोबरी साधून दिली. द्राझिच याचा हा यावेळच्या स्पर्धेतील चौथा गोल ठरला. बरोबरीच्या गोलनंतर एफसी गोवाने जोरदार आक्रमण केले, मात्र त्यांना आघाडी घेता आली नाही. तासाभराच्या खेळानंतर द्राझिच याचा भेदक हेडर गोलपट्टीच्या किंचित वरून गेल्यामुळे एफसी गोवाची नामी संधी वाया गेली.

FC Goa Vs Punjab
ISL 2026: FC Goa भिडणार पंजाबशी! दिल्ली येथे रंगणार लढत; मार्केझ यांच्या संघासमोर अपराजित राहण्याचे आव्हान

एफसी गोवाचा ही स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली. त्यांचे आता पाच सामन्यांतून नऊ गुण झाले आहेत. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना २२ मार्च रोजी चेन्नईयीन एफसीविरुद्ध चेन्नई येथे खेळला जाईल. पंजाब एफसीचीही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे आता चार लढतीनंतर पाच गुण झाले आहेत.

FC Goa Vs Punjab
Long Distance Relationship Tips: लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? जोडीदाराशी कनेक्ट होण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या गोष्टी

अपराजित मालिका कायम

सोमवारच्या बरोबरीनंतर एफसी गोवाची यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील, तसेच पंजाब एफसीविरुद्धची अपराजित मालिका कायम राहिली. आयएसएल स्पर्धेत मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने दोन विजय व तीन बरोबरी नोंदविली आहे, तर पंजाब एफसीविरुद्ध २०२३-२४ पासून एफसी गोवाने सामना गमावलेला नाही. त्यांनी उत्तर भारतीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पाच सामन्यांत तीन विजय व दोन बरोबरींची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com