Sankhali Muncipal Council  Dainik Gomantak
गोवा

Sankhali Municipality Election 2023: साखळीत मद्यविक्रीवर निर्बंध; बार, पब, दारू दुकाने 'या' वेळेपर्यंतच सुरू ठेवता येणार

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भरारी पथके सतर्क

Akshay Nirmale

Sankhalim Muncipal Council Election 2023: उत्तर गोव्यातील साखळी नगरपालिकेसाठी ५ मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात मतदारांना लुभावण्यासाठी दारूचे आमिष दाखवले जाते. त्या पार्श्वभुमीवर आता साखळीत मद्यविक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

उत्तर गोवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे की, कलम 144 तसेच गोवा उत्पादन शुल्क कायदा यानुसार साखळी नगरपालिकेच्या हद्दीतील बार, पब्ज, शॉप्स, क्लब रात्री दहापर्यंतच सुरू ठेवता येतील. येथे रात्री दहापर्यंतच दारूविक्री करता येईल.

त्या वेळेनंतर दारू विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इतर दुकाने किंवा आस्थापनांना ही नोटीस लागू नसेल. केवळ मद्यविक्रीवर या वेळेनंतर बंदी असेल. दहा नंतर दारू दुकाने सुरू ठेवता येतील, पण मद्यविक्री करता येणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित बार, दुकानाचा परवाना रद्द केला जाईल. तसेच दुकान मालकावरही खटला चालवला जाईल. भरारी पथकांनी याची खातरजमा करावी, असेही या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT