Charanjit Singh Channi: पंजाबच्या गोव्यातील संपत्तीचा गैरवापर; चन्नी यांच्यावर आरोप, 7 तास चौकशी

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी 7 तास चौकशी, 21 एप्रिलला पुन्हा चौकशी
Punjab EX CM Charanjit Singh Channi
Punjab EX CM Charanjit Singh Channi Dainik Gomantak
Published on
Updated on

Charanjit Singh Channi: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजित सिंग चन्नी यांची बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पंजाबच्या दक्षता ब्युरो (व्हिजिलन्स ब्युरो) ने सुमारे सात तास चौकशी केली. यात पंजाब सरकारच्या गोव्यातील संपत्तीचा गैरवापर केल्याचेही प्रकरण आहे.

Punjab EX CM Charanjit Singh Channi
Goa Driving License: गोव्यात नवीन लायसन्स काढायचंय? जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

पंजाब सरकारच्या गोव्यामधील जमिनीचा चन्नी यांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात गैरवापर केला. ही जमिन भाडेतत्वार देताना त्यांनी कमी किंमतीत दिली. त्यातून राज्याचे नुकसान झाले आहे, असे दक्षता ब्युरोने म्हटले आहे. चन्नींच्या निर्णयामुळे पंजाब सरकारच्या तिजोरती कमी पैसे आले. तथापि, यातून चन्नी यांना वैयक्तिक फायदा झाल्याची शक्यता असू शकते, असा कयास बांधला जात आहे.

दक्षता ब्युरोने त्यांची बिल्डरांशी कथित भागीदारी आणि अवैध वसाहतींच्या उभारणीबाबत चौकशी केली. तसेच चन्नी यांच्या कुटुंबाने कॅनडा आणि अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीबद्दलही चौकशी केली. चन्नी यांची परदेश भेट, परदेशातील वास्तव्य, ही परदेशवारी कुणी घडवली याबाबतही विचारणा करण्यात आली. परदेशातील उपचाराचे तपशील देण्यासही चन्नी यांना सांगितले आहे.

Punjab EX CM Charanjit Singh Channi
Goa Accidental Death: बेतोड्यातील महिलेसाठी स्पीडब्रेकर ठरला यमदूत! उपचारादरम्यान मृत्यू

चन्नी यांच्या मुलाच्या लग्नावर झालेल्या खर्चाबाबतही विचारणा करण्यात आली आहे. या लग्नात सरकारी पैशाचा वापर झाल्याचा आरोप आहे. अवैध खाणकामाबाबतही चन्नी यांना विचारणा केली गेली.

दरम्यान, दक्षता ब्युरोने 21 एप्रिल रोजीही चन्नी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. त्या दिवशी चन्नी यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान, या चौकशीनंतर चन्नी यांनी राज्य सरकारवर टीका करताना जाणीवपुर्वक लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. हे सरकार मुघलांपेक्षाही वाईट आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com