Silly Souls Café and Bar | Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

Silly Souls Row: 'सिली सोल्स' प्रकरणी संकल्प आमोणकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

सिली सोल्स प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी स्मृती ईराणींना केंद्रिय मंत्रीमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करा; संकल्प आमोणकर

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील सिली सोल्स बार आणि रेस्टॉरंटच्या (SILLY SOUL CAFÉ & BAR) कथित घोटाळा प्रकरणात केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी (Minister Smriti Irani) यांच्या मुलीचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या स्मृती ईराणी यांना केंद्रिय मंत्रीमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी काँग्रेस आमदार संकल्प आमोणकर (MLA Sankalp Amonkar) यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आमोणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले आहे.

"स्मृती इराणी यांनी त्यांच्या कुप्रसिद्ध ग्रॅज्युएशन पदवीच्या खोट्या प्रकरणानंतर गोव्यातील तिच्या कौटुंबिक व्यवसायावर पुन्हा एकदा संपूर्ण देशाला खोटे बोलले आहे. सर्व परिस्थितीजन्य पुरावे, ज्यांना 2019 च्या निवडणुकीत ईसीआय समोर दाखल केलेल्या नवीनतम प्रतिज्ञापत्राद्वारे समर्थित आहे. कंपन्यांच्या रजिस्ट्रारची कागदपत्रे, महाराष्ट्र आणि जीएसटीच्या तपशिलांवरून हे सिद्ध होते की, आसगाव येथील रेस्टॉरंट, सिली सॉल्स कॅफे अँड बार हे तिचे कुटुंब चालवते", असा आरोप आमोणकर यांनी केला.

संकल्प आमोणकर यांनी पत्रात असे म्हटले आहे की, स्मृती ईराणी यांनी गोव्यातील वादग्रस्त बार आणि रेस्टॉरंटशी त्यांच्या मुलीचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पर्थम दर्शनी समोर आलेल्या कागदपत्रानुसार ईराणी कुटुंबियांचा या बार आणि रेस्टॉरंटशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. येथे डुक्कराचे मटन दिले जाते का याविषयात मला जायचे नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात बारचा दारू परवाना देखील बेकायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. तसेच, बारचे बांधकाम देखील बेकायदेशीर असल्याचे दिसते.

"या प्रकरणात बेकायदेशीरपणे दारू परवाना जारी करणे आणि उपाहारगृहाचे बेकायदेशीर बांधकाम समाविष्ट आहे जे विविध कायद्यांचे उल्लंघन आहे. या सगळ्यावरून हा बार बेनामी असल्याचे आणि बेनामी पद्धतीने चालवला जात असल्याचे दिसून येते. 2014 च्या निवडणूकीत आपण काळा पैसा, बेनामी संपत्तीचा मुद्दा उचलून धरला होता. गोवा सरकारचे उत्पादन शुल्क, पंचायत, जीएसटी, टाउन आणि कंट्री प्लॅनिंग इत्यादी विविध विभाग या प्रकरणाच्या चौकशीत गुंतलेले आहेत आणि केंद्र आणि राज्याचे सरकार एकाच राजकीय पक्षाद्वारे (भाजप) चालवले जात असल्याने हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे ईराणी यांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाब असण्याची शक्यता आहे. असे आमोणकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

स्मृती ईराणी विश्वजीत राणे यांच्या 'बॉस'

संकल्प आमोणकर यांनी या पत्रात नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर निशाना साधला आहे. मंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) हे स्मृती ईराणी ह्या आपल्या बॉस आहेत असा उल्लेख करतात. त्यामुळे राणे याप्रकरणी काहीही बोलतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तसेच, प्रकरणाची चौकशी करणारे नगनियोजन खाते देखील त्यांच्याच अखत्यारित येत आहे. असे आमोणकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आमोणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना देखील टोला लगावत मुख्यमंत्री स्थानिक ते राष्ट्रिय मुद्यांवर आवज उठवतात पण, या प्रकरणात ते चिडिचूप आहेत.

आमोणकर पत्रात पुढे म्हणतात, मोदीजी तुम्ही ना खाऊंगा ना खाने दुंगा तसेच लेस गव्हर्नमेंट आणि मोर गव्हर्नस असा नारा दिला होता. त्यामुळे आमची मागणी आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू आहे तोपर्यंत स्मृती ईराणी यांना केंद्रिय मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. आणि जर त्या या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्या तर त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान द्यावे असे आमोणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manache Shlok Film Controversy: ‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत साहित्याचा अपमान, चित्रपटाचे नाव तात्काळ बदला, हिंदू जनजागृती समितीची मागणी

International Purple Fest 2025: गोव्यातील समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती दिव्यांग-सुलभ बनवणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला कर्णधार

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

SCROLL FOR NEXT