Sankalp Amonkar in Pariksha Pe Charcha Margaon  Dainik Gomantak
गोवा

Pariksha Pe Charcha : संकल्प आमोणकरांची 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाला हजेरी; विद्यार्थ्यांचा वाढवला उत्साह

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमात हजेरी लावली आणि त्यात भाग घेतला.

दैनिक गोमन्तक

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमात हजेरी लावली आणि त्यात भाग घेतला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधतात आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण सोडून सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करतात.

संकल्प आमोणकर यांनी मुख्याध्यापक तुलसीदास देसाई आणि विद्यार्थी यांच्यासमवेत सडा येथील मुरगाव हायस्कूलमध्ये या संवाद सत्रात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवरून 'परीक्षा पे चर्चा'च्या यंदाच्या संवाद कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत आहेत. ज्याचे राज्यभरातील 5464 सरकारी, निमसरकारी आणि खाजगी शाळांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. यामध्ये 10 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.

Sankalp Amonkar in Pariksha Pe Charcha Margaon

दरम्यान, या कार्यक्रमात विद्यार्थी त्यांच्या मनातील अनेक प्रश्न मोदींना विचारत आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पालकांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, त्यात गैर काहीच नाही. मात्र जर कौटुंबिक अपेक्षा सामाजिक स्थितीमुळे असतील तर ते चुकीचे आहे.

याबाबत त्यांनी मुलांसोबतच पालकांनाही काही गोष्टी सांगितल्या. मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्व पालकांना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT