Sanjivani Factory Theft Case Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Factory: संजिवनी कारखाना पार्किंगमध्ये चोरी; चालक, वाहकांवर स्प्रे मारून मोबाईल व रोकड लंपास

चोरट्यांनी 8 मोबाईल व 40 ते 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली

Rajat Sawant

Sanjivani Factory Theft Case: संजिवनी साखर कारखान्याच्या पे-पार्किंगमधील अवजड वाहनांमधून मोबाईल व रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शेजारील राज्यातील आलेल्या ट्रक मालकांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.

चोरट्यांनी 8 मोबाईल व 40 ते 50 हजार रुपयांची रोकड पार्क केलेल्या आठ अवजड वाहनांमधून लंपास केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या ‘पे पार्किंग’मध्ये ठेवण्यात आलेल्या ट्र्कच्या काचा काढून मोबाईलसह 40 ते 50 हजार रुपये लंपास केले.

ट्रकमध्ये झोपलेल्या चालक, वाहकांवर स्प्रे मारून बेशुद्ध करून 8 मोबाईल व सर्व गाड्यातील मिळून 40 ते 50 हजार रुपये रोख रक्कम अज्ञातांनी पळून नेले. गेले दोन दिवस सतत अशा घटना घडत आहे.

गोव्यात अशा स्वरुपाचे ट्रक टर्मिनल पार्किंग हब नसल्याने फोंडा ट्रक असोसिएशनचे सचिव नागराजन नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, गोवा सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकर ट्रक टर्मिनल पार्किंग हब उभारावा.

संजीवनीचे प्रशासक सत्तेज कामत म्हणाले, "आम्ही जेव्हा त्यांच्याकडून पे पार्किंगसाठी पैसे आकारतो आणि त्यांना पावती देतो, त्या पावतीमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे, की चोरी वगैरे झाल्यास आम्ही जबाबदारी घेणार नाही."

"कारखान्याच्या या जागेत अशा स्वरूपाची चोरी झाली असल्याने आत्ता या पुढे अशा प्रकारची स्वरूपाची चोरी होऊ नये, यासाठी आम्ही त्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरा बसविणार आहोत. पेट्रोल पंप जवळच असून रात्रपाळीत आमचे कामगार त्या पे पार्किंगच्या जागेवर राऊंड मारीत असतात. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी रात्रीचा राऊंड मारला पाहिजे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT