Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: ‘संजीवनी’चा मत्स्यपालनावर भर!

दैनिक गोमन्तक

Sanjivani Sugar Factory: राज्यातील एकमेव असलेल्या संजीवनी साखर कारखान्याला घरघर लागल्यानंतर या कारखान्याचे भवितव्य काय, याबाबत चर्चा होत असतानाच कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांनी ‘संजीवनी’कडील आहे त्या साधनसुविधांचा वापर करून ऊस नव्हे तर भाजीपाला लागवडीवर भर दिला आणि आता तर मत्स्यपालन करण्याची योजना साकारली जात आहे. येत्या शुक्रवारी 5 रोजी मत्स्यपालन योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

संजीवनीच्या ऊस उत्पादकांचे भवितव्य काय याबाबत कुणालाच काही माहीत नाही. ‘संजीवनी’कडून दरवर्षी ऊस गाळप केले जायचे, पण गेली चार वर्षे हे गाळपच बंद झाल्यानंतर ऊस सोडून इतर नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना सरकारकडून दिला गेला.

त्यासाठी पंचवार्षिक आर्थिक तरतूद ऊस उत्पादकांसाठी सरकारने केली असून पुढील वर्षी ही पंचवार्षिक योजना संपुष्टात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘संजीवनी’च्या पडिक जमिनीत सध्या भाजीपाला लागवड करण्यात आली असून या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, हे विशेष.

‘संजीवनी’कडील पडिक असलेल्या जमिनीचे 24 प्लॉट तयार करण्यात आले असून त्यात सर्वप्रकारची भाजीची लागवड केली जात आहे. आहे त्या साधनांचा आणि मनुष्यबळाचा वापर करून ही भाजीपाला लागवड केली जात आहे आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही लाभत आहे.

ही योजना ‘संजीवनी’चे प्रशासक सतेज कामत यांनी मार्गी लावून यशस्वीही करून केली आहे. त्यामुळे पुढील मत्स्यपालन योजनाही यशस्वी होईल, असा विश्‍वास सतेज कामत यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

मत्स्यपालनासाठी प्रयत्न...

‘संजीवनी’कडे असलेल्या जमिनीत उसाचे गाळप केल्यानंतर होणारा कचरा तसेच इतर साहित्य टाकण्यासाठी मोठे खड्डे खोदून ठेवले होते. या खड्ड्यांचा वापर आता मत्स्यपालनासाठी करण्यात येत आहे. या खड्ड्यांचे सुयोग्य नियोजन करून त्यावर प्लास्टिक आवरण तसेच संरक्षक कठडा आणि अन्य साहित्यातून हे खड्डे व्यवस्थित पाणी घालून मत्स्यपालनासाठी सज्ज करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या कामासाठी ‘संजीवनी’कडे असलेल्या साधनसुविधांचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे उपलब्ध साधनांतच नवं काही तरी करण्याचा उपक्रम प्रशासक सतेज कामत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

100 रुपयात पिशवीभर भाजी !: संजीवनीच्या पडिक जमिनीत लागवड करण्यात आलेली भाजी रास्त दरात विकण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. काल १ जानेवारीपासून १०० रुपयांत पिशवीभर भाजी असा उपक्रम ‘संजीवनी’च्या आऊटलेटवर सुरू करण्यात आला आहे. ज्या भाज्या उपलब्ध असतील, त्या भाज्या या शंभर रुपयांत दिल्या जात आहेत. त्यात विशेषतः मुळा, तांबडी भाजी, भेंडी, दोडकी, वालाची भाजी, काकडी, वांगी अशा किमान सहा भाज्यात उपलब्ध केल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT