Goa Politics: काब्राल यांचा त्‍याग विसरणार नाही!

Goa Politics: मुख्‍यमंत्री : कुडचडे-काकोडा आरोग्यकेंद्राचे लोकार्पण; दुसऱ्या उपजिल्हा इस्‍पितळाचा दर्जा
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: आमदार नीलेश काब्राल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षासाठी त्‍याग केला आहे. त्‍यांचे हे योगदान पक्ष कधीच विसरणार नाही. येत्या तीन वर्षांत कुडचडेतील सर्व रेंगाळत पडलेले प्रकल्प मार्गी लावण्‍यात येतील. त्यामुळे काब्राल यांनी काळजी करू नये, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Nilesh Cabral
Goa Comunidade: शेडचे बांधकाम पुढील निर्णयापर्यंत राहणार बंद

कुडचडे-काकोडा आरोग्यकेंद्राचे उद्‌घाटन करण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागली. पण आता एक सुसज्ज असे इस्‍पितळ तयार झाले आहे. या इस्‍पितळाचा दर्जा वाढवून त्‍यास राज्यातील दुसऱ्या उपजिल्हा इस्‍पितळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली

कुडचडे-काकोडा इस्‍पितळाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नगराध्यक्ष प्रदीप नाईक, गोवा साधनसुविधा महामंडळाचे (जीएसआयडीसी) उपाध्यक्ष केदार नाईक व मान्यवर उपस्थित होते.

बांबोळीतील गोमेकॉवर बराच ताण येत आहे. तेथील पंधरा ऑपरेशन थिएटर्स रोज कार्यरत असतात. यावरून या इस्‍पितळात किती रुग्‍ण येतात याची कल्‍पना येते.

Nilesh Cabral
Vishwakarma Yojana: 10 केंद्रांवर विश्‍वकर्मा प्रशिक्षण

गोमेकॉवर सतत वाढणाऱ्या ताणामुळे दक्षिण गोव्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा वापर केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्‍येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्‍वत:ला हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज पडू नये यासाठी लोकांनीच स्‍वत:हून प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्‍हणाले.

कुडचडे कदंब बसस्थानक, जलतरण तलाव तसेच अन्‍य सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षांत मार्गी लावण्‍यात येतील. कोविड महामारी आणि आर्थिक तुडवट्यामुळे हे प्रकल्प अर्धवट राहिले होते. पण आता परिस्थिती सुधारली आहे. राज्यात वैद्यकीयतज्‍ज्ञांची कमतरता आहे. कंत्राटी पद्धतीवर तज्‍ज्ञ घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला इस्पितळात उपचार घेण्यासाठी लोक आलेले नको आहेत. उपचार घेण्यापेक्षा त्‍यांनी समुपदेशनासाठी यावे. -

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री कुडचडे

काकोडा आरोग्‍यकेंद्राच्‍या विषयावरून माझ्‍यावर बरीच टीका झाली. पण डायलिसिस विभागाबरोबर इतर सर्व सुविधा उपलब्‍ध करूनच इस्पितळ सुरू करण्याचा निर्धार आपण केला होता. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दहा मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेले शवागर आदी सुविधा उपलब्‍ध करण्यात आल्या आहेत. टीका करणारे अनेक आहेत, पण सहकार्य करणारे कोणी नाही. पुढील सहा महिन्यांत उर्वरित सेवा पुरविल्या जातील.

- नीलेश काब्राल, आमदार (कुडचडे)

देशाला नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून योग्य नेतृत्व मिळाले आहे. गोव्‍यात लोकांना मोफत औषधे आणि उपचार दिले जात आहेत. जेथे आवश्यकता आहे, तेथे आवश्‍‍यक त्‍या सुविधा पुरविल्‍या जात आहेत. कॅन्सरसारख्‍या दुर्धर आजारावर गोव्‍यातच उपचार उपलब्‍ध होत आहेत. मुंबईतील टाटा मेमोरियलच्या माध्यमातून अत्‍याधुनिक वैद्यकीय सुविधा गोमंतकीयांसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा आपला प्रामाणिक प्रयत्‍न आहे. -

विश्‍‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com