Goa School: प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमणार, ती बनलीय काळाची गरज

Goa School: शैलेश झिंगडे : मुलांचे वर्तन सुधारण्‍यास, समस्‍या सोडविण्‍यास निभावणार महत्त्वाची भूमिका
Goa School
Goa SchoolDainik Gomantak
Published on
Updated on

Goa School: आजचा शिक्षक मुलांच्‍या अभ्यासातील समस्या सोडवतो. करिअरबाबत विविध व्याख्याने, कृतिसत्रे, कार्यशाळा आयोजित करून व्यवसायनिवडीसंबंधी जागरूकता करणं त्याला शक्‍य होतं. परंतु मुलांच्या वर्तनसंदर्भातील समस्या सोडवण्यास शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो का, याबाबत शंकाच आहे.

Goa School
Goa Fraud Case: बनावट सही करून मालमत्ता हस्‍तांतरित

समुपदेशकाच्या मदतीशिवाय अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सजग होणार नाही. याचा विचार करून प्रत्येक शाळेत समुपदेशक असणं हे अनिवार्य आहे, नव्हे ती काळाची गरज आहे, असे उद्‌गार शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काढले.

येथील राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात गोवा विकास शिक्षण महामंडळ आयोजित तीन दिवशीय समुपदेशक आणि पर्यवेक्षक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी झिंगडे बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर गोवा विकास शिक्षण महामंडळचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर, सदस्य सचिव वर्षा नाईक, व्यवस्थापक ब्रिजेश शिरोडकर व अन्य मान्‍यवर उपस्थित होते. शाळेत समस्याग्रस्त, समुपदेशनाची गरज असलेले असंख्य विद्यार्थी असतात. ही मुले समस्यांना तोंड देऊ शकत नाहीत. त्याचे परिणाम त्यांच्या वर्तनात दिसू लागतात.

त्यासाठी राज्‍यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक बोलावून त्यांना आज प्रत्येक शाळेत समुपदेशक का आवश्यक आहे, यासंबंधी मार्गदर्शन करणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत खास समुपदेशासाठी वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे झिंगडे म्‍हणाले.

Goa School
Goa Comunidade: शेडचे बांधकाम पुढील निर्णयापर्यंत राहणार बंद

अनेक क्षेत्रांतील मान्‍यवरांचे मार्गदर्शन

या तीन दिवसांच्या कार्यशाळेत वेगवेगळ्या सत्रांत प्राची खांडेपारकर यांच्‍यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात डॉ. शेखर साळकर यांनी ‘ड्रग्सचे दुष्परिणाम’, ॲड. एमिडिओ पिनो यांनी ‘मुलांवरील लैंगिक अत्याचार आणि कायदा’ तर अंतरंग फाऊंडेशनतर्फे व्यावसायिक मार्गदर्शन करण्‍यात आले. आश्‍लेषा शेट्ये यांनी गोवा विकास शिक्षण महामंडळातर्फे नियुक्त केल्या जाणाऱ्या समुपदेशकांबाबत माहिती दिली. डॉ. प्रियंका एस. यांनी ‘कुमारावस्थेतील मुलांच्या मानसिक समस्या’ याविषयी मार्गदर्शन केले.

राज्‍यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक बोलावून त्यांना आज प्रत्येक शाळेत समुपदेशक का आवश्यक आहे, यासंबंधी मार्गदर्शन करणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत खास समुपदेशासाठी वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com