Goa Crime News |school Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सांगे उच्च माध्यमिक हायस्कूलचा विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरु

सांगे उच्च माध्यमिक हायस्कूलच्या गणवेशात सकाळी घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी 18 जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सांगे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीमध्ये शिकणारा देवरे-नेत्रावळी येथील विठू गंगो वरक हा 18 वर्षीय विद्यार्थी मंगळवार, ता.18 जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली आहे.

त्याच्या कुटुंबीयांनी जवळपासच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे चौकशी करून पाहिली; पण कुठेही त्याचा शोध लागला नाही.

सांगे उच्च माध्यमिक हायस्कूलच्या गणवेशात सकाळी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडल्यानंतर विचुन्द्रे येथे दुचाकी पार्क करून विद्यालयाच्या बसमधून सांगेत येत असे. त्या दिवशी त्याने आपली दुचाकी नेहमीच्या जागी पार्क करून ठेवली आहे.

चावीही दुचाकीला तशीच आहे, पण बसमध्ये न जाता अन्य वाहनातून तो थेट कुडचडे बस स्थानकावर दुपारी दोनपर्यंत युवकांच्या गटात दिसला असल्याची माहिती पाहणाऱ्यांनी दिली. त्याने आपला मोबाईल स्वीच ऑफ केल्याने नेमका तो कुठे आहे, हे समजणे कठीण झाले आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कोणताही वाद, तंटा झाला नाही. असे असताना घरातील मुलगा अचानक गायब होणे, हे धक्कादायक असून पोलिसांनी त्याला शोधून काढावे, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसही त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

Salt Pan Preserve: गोव्याच्या 'मिठागरांना' नवसंजीवनी! राज्य सरकारकडून 95 लाखांची तरतूद, 75 शेतकर्‍यांना मिळणार थेट लाभ

कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT