Salaulim Dam Overflow Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam: साळावली भरले! धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; सांगे परिसरात पर्यटकांची गर्दी

Salaulim Dam Overflow: चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या गोमंतकीय पर्यटकाचे आकर्षण असलेले साळावली धरण तुडुंब भरलेले असून संध्याकाळी ते ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यामुळे जलाशयातून पाणी वाहू लागले.

Sameer Panditrao

सांगे: चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या गोमंतकीय पर्यटकाचे आकर्षण असलेले साळावली धरण तुडुंब भरलेले असून संध्याकाळी ते ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यामुळे जलाशयातून पाणी वाहू लागले. धरणातून पाण्याचा होणारा विसर्गाचे हे नयनरम्य दृश्‍य पाहण्यासाठी स्थानिकासह, सांगे पर्यटकांनीही गर्दी केली.

संध्याकाळी धरणाच्या वरील भागात पावसाचा जोर वाढल्याने संध्याकाळी ५. ३० वा. भरून वाहू लागल्याची अधिकृत माहिती जल संपदा खात्याचे अधिकारी स्वप्नील दिवकर यांनी दिली. थील विहंगम दृश्याचा नयनरम्य नजराणा पाहण्यासाठी आता लहान थोरांची पावले साळावलीच्या वाटेकडे मोठ्या प्रमाणात वळणार आहेत. परिणामी सांगे बाजारात पावसाळी पर्यटन फुलल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

वास्तविक साळावलीचे जलाशय जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पाऊस लांबला तर तिसऱ्या आठवड्यात सुद्धा जलाशय भरून वाहते. पण प्रथमच जून महिन्यात जलाशय तुडुंब भरला आहे.

मे महिन्यात पडलेला पाऊस आणि आता पडत असलेला पाऊस जमा केल्यास धरणात एकेचाळीस मीटर उंचीचे पाणी साचले आहे. पाण्याचा साठा पाहता जुलै महिन्यात पाण्याची उंची अधिक वाढण्याची शक्यता आहे. साळावली धरणात कितीही पाणी भरले, तरी जादा पाणी नदीत वाहून जात असते.

सायंकाळी ‘ओव्हर फ्लो’

आजपर्यंत १२२५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार यंदा पावसाने जोर पकडला नसला तरी धरणाच्या वरील भागात पडणारा पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली. बुधवारी संध्याकाळी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. उद्यापासून या परिसरात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT