गोमन्तक डिजिटल टीम
निसर्गसंपन्न सांगे तालुक्यात दोन डोंगरांमध्ये साळावली धरण वसलेले आहे.
पावसाळ्यापासून भरून वाहणारा साळावलीचा विसर्ग नुकताच थांबला आहे.
यावर्षी गोव्यात पावसाने पावसाळ्यापासून कहर केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून भरून वाहणारा साळावली धरणाचा जलाशय नुकताच शांत झाला आहे.
विक्रमी पाऊस पडूनसुद्धा अनुचित घटना घडली नसल्यामुळे साळावली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यंदा ७ जुलैपासून जलाशय भरायला सुरवात झाली आणि २७ नोव्हेंबर रोजी बंद झाली.
१९ जुलै रोजी सर्वाधिक ४२.९२ लिटर पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले.
धरणात ४१.१५ मीटर इतका उंच जलसाठा आहे. यंदा एकूण ५४८० मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.