Cortalim Accident Dainik Gomantak
गोवा

Cortalim Accident: कोटार्लीत 2 दुचाकींच्‍या अपघातात तिघे जखमी, बुलेटचालकाचा निष्‍काळजीपणा; गुन्हा नोंद

sanguem cotarlim bullet scooter accident: सांगे तालुक्यातील कोटार्ली परिसरात बुलेट मोटारसायकल आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक तसेच दुचाकीवर असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सांगे तालुक्यातील कोटार्ली परिसरात बुलेट मोटारसायकल आणि स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक तसेच दुचाकीवर असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सांगे पोलिसांनी बुलेटचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कुडचडे परिसरातील क्लेवन फर्नांडिस हे बुलेट मोटारसायकलवरून कोटार्लीहून दांडो-सांगेच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी मोटारसायकल भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे.

कोटार्ली परिसरात पोहोचल्यावर बुलेट मोटारसायकलने दांडोहून मळकर्णेच्या दिशेने जाणाऱ्या ॲक्टिव्हा स्कूटरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने रस्त्यावर कोसळली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. ॲक्टिव्हा स्कूटर चालवत असलेल्या केवण-कोळंब येथील प्रेमा गावकर जखमी झाल्या. तसेच बुलेट मोटारसायकल चालक क्लेवन फर्नांडिस हेही जखमी झाले. बुलेटवर मागे बसलेले बागवाडा-सर्वण येथील मिहीर कुडतरकर हेही जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना त्वरित उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्‍पितळात दाखल करण्यात आले. सांगे पोलिसांनी पंचनामा केला.

बेदरकारपणा नडला

प्राथमिक तपासात निष्काळजी आणि बेदरकार वाहन चालविल्‍यामुळे अपघात घडल्याचे समोर आल्याने सांगे पोलिसांनी बुलेटचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सांगे साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास गावकर यांनी या प्रकरणी तक्रार केली. तेच या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT