Goa Ganesh Chaturthi
Goa Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: कुंभारजुवेत रंगला सांगोडोत्सव

दैनिक गोमन्तक

खांडोळा: गणपती विसर्जनाची अनोखी आणि जुनी पोर्तुगीजकालीन पध्दत म्हणजे कुंभारजुवे माशेल- सांगोडोत्सव होय. आपली ही प्रथा माशेल -कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे. वर्षानुवर्षे ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगोडाची संख्या आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावे यंदाही साकारले होते.

(Sangodotsav in Kumbharjua Goa Ganesh chaturthi)

नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होती. कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच. गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल - कुंभारजुवेचा सांगोडचा (नौकाविहाराचा) अविस्मरणीय दिवस असतो.

कुंभारजुवे गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण गावच त्या उत्सवात सामील झाला होता. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर, तसेच पुलावर भाविक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. श्री शांतादुर्गेचा केशरी रंगाच्या गणपतीचे सात दिवस देवस्थानात पूजन झाले. सातव्या दिवशी फटाक्‍यांच्या अातषबाजीत मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत श्रीं मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत माशेलचे श्री. करंडे व श्री. सुखटणकर यांचे गणपती सहभागी झाले. ही अनेक वर्षे चालू असलेली परंपरा असून यंदा शांतादुर्गेच्या ‘सांगोड’बरोबर कुंभारजुवे व माशेल तारीवाड्यावरील वेगवेगळे क्‍लब, सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर केले. नदीत सांगोड फिरताना पाहण्यासाठी मोठी गर्दी होती.

सांगोडोत्सवाचा निकाल : प्रथम क्रमांक फिरता चषक व रोख बक्षिस (टीम ४५ जब देवलोक के इंद्रने रावण को बंदी बनाना चाहा). द्वितीय- सार्वजनिक सरस्वती मंडळ (देवदेवतांकडून भूतांचा पुनर्जन्म), तृतीय - श्री कृष्ण बाणासूर युध्द. उत्तेजनार्थ प्रथम- समुंद्र मंथन. उत्तेजनार्थ-द्वितीय - रावणाची ग्रहावर स्वारी. उत्तेजनार्थ - तृतीय - रावणद्वारा यमलोकपर आक्रमण या सांगोड देखाव्यांना पारितोषिके प्राप्त झाली तर खास बक्षीस - ‘आमचे गोवा’ या संघाने पटकावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT