गोवा: ज्या राज्यात कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा करते, तेथे वृद्धांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षी ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापैकी 50 प्रकरणांपैकी चार नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.
(Drastic rise in crimes, offences against senior citizens)
फतोर्डा येथील मिंगुएल मिरांडा आणि त्यांची सासू कॅटरिना पिंटो यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली हेती. ही घटना 2021 मध्ये नोंदवलेल्या दोन खुनाच्या गुन्ह्यांपैकी एक होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या गेल्या कॅलेंडर वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते की राज्यात 50 प्रकरणे नोंदवली गेली. 2020 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 31 आणि मागील वर्षातील 40 प्रकरणांच्या तुलनेत 'ज्येष्ठ नागरिकांविरुद्धचे गुन्ह्यामध्ये' लक्षणीय वाढ झालेली आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हेगारी घुसखोरी, खोटेपणा, गंभीर आणि साध्या जखमा, फसवणूक, अपहरण या गुन्ह्यांचा समावेश आहे.
गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा; गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान
राज्यात दिवसेंदिवस विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या अडीच महिन्यांत राज्यातील पोलिस ठाण्यात विविध प्रकारच्या जवळपास ४० प्रकरणांची नोंद झाली असून, यात चोरी, मारामारी, अमलीपदार्थ विक्री, सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक, दारूची तस्करी, आयपीएल सट्टा, बेकायदा कॅसिनो, बनावट नोटा आदींचा समावेश आहे.
गेल्या अडीच महिन्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांत १३ चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तर अमलीपदार्थ प्रकरणी १० गुन्हे नोंद झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पणजीतील एका कुरिअर कंपनीतून १.३७ लाख रुपयांच्या तब्बल १०७ मोबाईलची चोरी झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले होते. सुकूर-पर्वरी येथील देवश्री गार्डन या रहिवाशी संकुलात घरफोडीची घटना घडली.
राज्यात गुन्हेगारी यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसात राज्यात तब्बल चार संशयित मृत्यू झाल्याचे समोर आले असुन, काही दिवसांपूर्वीच गौरी आचारी हिचा एक तर्फी प्रेमातून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तितक्यात सोनाली फोगट यांच्या मृत्युचे गुढ काही सुटत नाहीये
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.