Illegal Sand Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Extraction : हायड्रोग्राफी अभ्‍यासाशिवाय रेतीउत्खनन अयोग्‍य

पर्यावरणप्रेमींचा दावा : नद्यांचा विचार गरजेचा; पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sand Extraction : रेतीमाफियांनी कुडचडे येथे या व्यवसायातील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या इराद्याने एका कामगाराचा गोळ्या घालून खून केला होता. या पार्श्वभूमीवर गोव्यात पारंपरिक पद्धतीने रेतीउत्खनन सुरू करण्यास मान्यता द्या अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर शासकीय पातळीवरून त्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी राज्‍यातील नद्यांचा हायड्रोग्राफी पद्धतीने अभ्यास केल्याशिवाय अशी मान्यता देणे शक्यच होणार नाही असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

पारंपरिक रेतीव्‍यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलाविलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ५ हेक्टरच्या पट्ट्यात वाळू काढण्यासाठी पर्यावरणीय परवानगी घेण्याची गरज नाही असा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला कायद्याला धरून नसल्याचा दावा यापूर्वी अवैध रेतीव्यवसायाविरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल केलेले रेनबो वॉरियर्सचे निमंत्रक अभिजीत प्रभुदेसाई यांनी सांगितले.

बंदर व कप्तान खात्याकडे यासंदर्भातील जो तपशील आहे तो 20 वर्षांपूर्वीचा आहे. मागच्या 20 वर्षांत असा अभ्यास झालेलाच नाही. मध्यंतरीच्या काळात या नद्यांमधून लाखो टन रेती काढली गेली आहे. त्यामुळे आता परिस्थिती नक्कीच बदललेली आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दरवर्षी डोंगरावरून जेवढ्या प्रमाणात रेती वाहून येते, तेवढीच रेती काढता येते. त्यापेक्षा जास्त रेती काढणे म्हणजे पर्यावरणीय असमतोल होण्‍यास आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासाठीच हायड्रोग्राफी अभ्यास महत्त्वाचा आहे असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT