कळंगुट : गोव्यातील प्रसिद्ध बागा बिचवर सध्या व्यावसायिक एका वेगळ्याच चिंतेत असल्याचं दिसत आहे. बागा बीचवरील वाळू खचल्याने किनाऱ्यावरील शॅकमालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. वाळू खचल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेले शॅक्स आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी वापरण्यात येणाऱ्या बोट व्यावसायिक त्रस्त आहेत. (Baga Beach News Updates)
बागामधील स्थानिक आणि व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार जोरदार लाटांमुळे बागा किनाऱ्यावरील (Beach) वाळू खचली आहे. ज्यामुळे किनाऱ्यावर पाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. वाळूची पातळी खाल्यावल्याने बीचवरील शॅक्समध्ये पाणी घुसू लागलं आहे. काही शॅक्सचं पाण्यामुळे नुकसानही झालं आहे. सातत्याने पाण्याच्या लाटांमुळे शॅक्स आणि समुद्रामध्ये (Sea) पाण्याचा मार्ग बनला आहे, ज्यामुळे धोका वाढला आहे.
बागा किनाऱ्यावरील वाळू खचल्याने येणाऱ्या पर्यटकांवरही परिणाम होणार आहे. शॅक्स खचू लागल्याने पर्यटक (Tourist) शेजारील कळंगुट, हणजुणे, कांदोळी बीचला पसंती देत असल्याचं चित्र आहे. यासोबतच वॉटर स्पोर्ट्सवेळीही पर्यटक सावधगिरीची भूमिका घेताना दिसत आहेत. वाहून गेलेली वाळू बागा नदीत साचली असून त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने याप्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती केवळ हायटाईडवेळीच उद्भवत होती, मात्र आता ही नित्याचीच बाब झाल्याचं बोललं जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.