Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa News: साकोर्डा परिसरात गोलमाल है भाई, सब गोलमाल है!

साकोर्डा पंचायत क्षेत्रात अरुंद रस्त्याने चिरेवाहतूक; अपघाताची भीती

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : साकोर्डा पंचायत क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात चिरेवाहतूक सुरू असल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सत्तरी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीतील वाहतूक साकोर्डा पंचायत क्षेत्रातून वळविण्यात येत असल्याने परिसरात अरुंद रस्त्यांवर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सत्तरी आणि धारबांदोडा तालुके शेजारी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर चिरेवाहतुकीची वर्दळ वाढली आहे. सत्तरी भागातील ही वाहतूक साकोर्डा पंचायत क्षेत्रातून केली जात आहे. सदर वाहतूक शेळ-मेळावली ते कुंभारवाडा मार्गावरून होत असून सदर रस्ता अरुंद आहे. चिरे घेऊन सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रकांमुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.

गोलमाल है भाई, सब गोलमाल है!

साकोर्डा पंचायत क्षेत्रात बेकायदेशीरपणे चिरेखाणी सुरू आहेत. परंतु परिसरात फेरफटका मारल्यास सदर चिरेवाहू ट्रक दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या गावातून वाहतूक करीत असल्याचे दिसून येते. दुसऱ्या तालुक्यातून चिरेवाहतूक करण्याचे कारण अजून स्पष्ट होत नसले तरी तर काहीतरी गोलमाल असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT