Goa ZP Election 2025 Dainik Gomantak
गोवा

ZP Election 2025: सांकवाळमध्‍ये मोठा फेरबदल, माविनच्‍या समर्थक अनिता थोरात यांना भाजपने उमेदवारी नाकारली; सुनील गावस यांना तिकीट

Goa ZP Election: भाजपकडून बिनविरोध निवडून आलेल्या आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद पटकावलेल्‍या ॲड. अनिता थोरात यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: सांकवाळ जिल्‍हा पंचायत मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपकडून बिनविरोध निवडून आलेल्या आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद पटकावलेल्‍या ॲड. अनिता थोरात यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारत सुनील गावस यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.

सुनील गावस हे भाजपचे जुने कार्यकर्ते असून त्यांनी कुठ्ठाळी भाजपमध्ये सदस्य, उपाध्यक्ष अशी पदे सांभाळली आहेत. सध्या ते मंडळाचे सरचिटणीस आहेत. मुरगाव तालुक्यातील दोन जिल्हा पंचायत मतदारसंघांपैकी सांकवाळसाठी भाजपने गावस यांची निवड निश्चित केली आहे. दुसरीकडे, अनिता थोरात या पंचायतमंत्री आणि दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याचे कारण काय, याबाबत मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.

सांकवाळ मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी अच्‍च्युत नाईक, राजेश शेट्टी यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले होते. मंडळाने तिघांची नावे वरिष्ठांकडे पाठविली होती. मात्र सुनील गावस यांना तिकीट मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद तर इतर इच्छुक व त्यांच्या गटांमध्ये नाराजीची भावना दिसत आहे. हे असंतुष्ट कार्यकर्ते गटबाजी करणार की पक्षनिष्ठा राखणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्‍यान, कुठ्ठाळी मतदारसंघात भाजपने उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही; मात्र आमदार आतोन वाझ यांच्या पत्नी मेर्सियाना वाझ यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. मागील पोटनिवडणुकीत त्या याच मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. दरम्‍यान, थोरात यांनी आपली भूमिका अद्याप स्‍पष्‍ट केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT